Skip to main content

Posts

Showing posts from February, 2013
तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग-१  खूप दिवसापासून तोरणा ते राजगड ट्रेक करायचा विचार डोक्यात खोळंबून बसला होता. शेवटी ३० डिसेंबर  ते १ जानेवारी पर्यंत हा ट्रेक करायचा निर्णय घेतला. Plan ठरला आणि Event जाहीर करूनहि टाकला. mobile ची रिंग वाजू लागली आणि हळूहळू ट्रेकला येणाऱ्या मुलांची यादी तयार झाली. तोरणागडावर आम्ही मुक्काम करणार नव्हतो (पाण्याची सोय नव्हती म्हणून ). पण ह्याच दरम्यान गडावर भूत असल्याची बातमी आमच्या कानावर येवू लागली. त्यात Height म्हणजे एकाने चक्क मला Message केला कि "भुतांना घाबरताय म्हणून तोरणावर मुक्काम करणार नाहीत का ? " शेवटी 'खाज' म्हणतात ना त्याप्रमाणे तातडीने निर्णय घेवून टाकला कि आता तोरणगडावर आम्ही मुक्काम करायचाच . वेल्हे गावातील तोरणा विहार हॉटेल चे मालक भाऊ कदम आणि राजगड पायथ्याच्या पाली गावातील तुषार भोसले यांना फोन करून नाश्त्याची व जेवणाची सोय केली.  २९ ला रात्री ११ वाजता मुंबईहून येणार्यांना ठाणे रेल्वे स्थानकावर भेटायचे ठरले तर ३० ला स्वारगेट स्थानकावर पुणे व इतर जिल्ह्यातून येणार्यांना ५ ...