Skip to main content

Posts

Showing posts from April, 2013
|| रायगडाच्या अन राजांच्या भेटीला ||---------- खूप दिवसांपासून रायगडला जाण्याचा बेत होता परंतु कामाच्या रहाट-गाडग्यामुळे तो नेमका फेल जायचा.. आमच्या गडवाटच्या ग्रुपसोबत सुद्धा जाता आले नाही..त्यातच २७ फेबला कुणालच्या लग्नाला रोहा येथे जायचे होते त्यातच सर्दीने घायाळ केल होत पण शेवटी राहविले नाही . मग ठरलं आमच्या सरांकडून सुट्टी मागितली आणि योग जुळून आला. काही मित्रांना सांगितले आणि तेही तयार झाले.मग अडकवली Bag खांद्याला..आणि निघालो राजांच्या भेटीला..  २४ फेबला स्वप्नील च्या घरी मुक्काम केला जाताना कुणालला भेटवस्तू म्हणून राजांची प्रतिमा द्यायची ठरली होती.. ती मोठी प्रतिमा घेऊन रायगडलाच जाण्याचा बेत होता पण फ्रेम जड असल्याने तो रद्द केला आणि ती प्रतिमा महाडला अमितच्या घरी ठेवायची ठरली. अमित आणि रत्नदीप आम्हाला महाडला भेटणार होते आणि मी, स्वप्नील मुंबईहून निघणार होतो. महाडला ११ वाजता पोहोचायचं ठरले होते. स्वप्नील साहेबांच मत ST ने जायचं अन माझ मत रेल्वे ने जायचं होत पण शेवटी गर्दीत सर्दी नको म्हणून ST नेच प्रवास करायचा ठरलं.. ७.३० ला पनवेलहून ST पकडली तरीही तिथेही गर्द...