अप्पर सीटवर जागा मिळाली रुप्याचा MP3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली अन कधी सोलापूर आले कळलंच नाही. स्टेशनबाहेर असलेल्या प्रसिद्ध "अमृततुल्य" चा चहा पियालो. आज दसरा होता गडवाट परिवाराकडून परांडा किल्ल्यावर आज तोरण बांधले जाणार होते ... जुना गडवाटकरी मित्र सुदर्शन हारफूले घेऊन हजर झाला बऱ्याच वर्षांनी गळाभेट झाली. दोन्ही गाड्या आल्या.. बॅगा ठेवून जागा पकडल्या.. तिथूनच पुढे एका उडप्याच्या हॉटेलात आमचा पोटभर नाश्ता झाला. सुदर्शनला निरोप देताना काढलेला ग्रुप फोटो सोलापूर येथील संभाजी महाराज चौकात सुदर्शनला निरोप दिला आणि भटक्यांच्या दसऱ्याला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली तशी पोर रानवारा पिऊन तरतरीत झाली होती. आमच्या गाडीत मी, मोठा अमर, सुबोध, रुपेश, सुरज, जयेश आणि किशोर अशी टीम होती तर बाकीची दुसऱ्या गाडीत. दोन्ही गाडीत धमाल मस्ती सुरु झाली. वैराग येथे दोन मित्रांची सोबत झाली आणि इथला फक्कड चहा झाला. आता पुढील लक्ष होते बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर .. सोलापूर ते बार्शी ७० किमी असे दीड तासाचे अंतर आहे. १०:३० वाजता आम्ही भगवंत मंदिरात पोचलो. विष्णू...