Skip to main content

आमच्या बद्दल

"आई आलोच ग... " 'सहजच सुट्टी असली की घरातून बाहेर पड़ाव. वाट वाकडी करून थोड शहरापासून, लोकवस्तीपासून दूर जाव. निवांत गाडी हाकता हाकता मध्येच छत फाटून त्याची जाळी झालेल्या चहाच्या टपरीवर थांबाव. गरम गरम वाफाळलेल्या चहाच्या झुरक्या बरोबर सोबत्याशी पुढचा प्लान करायचा आणि गाडी पुन्हा लगबगीन हाकुन दूर डोंगर-दर्यांच्या कुशीत गायब व्हायच '. अस असत आमच कधी सगळ ठरवून तर कधी अचानक सुट्ट्याची लोटरी लागली म्हणून तर कधी उगाच मनात आल म्हणून घराच्या बाहेर पडलेले आम्ही सवंगडी ' भटके ' होय ' जातिवंत भटके '. सर्वांना आवडच नाही किंवा छंद म्हणून नाही तर कुठेतरी काहीतरी कोणीतरी हाक मारतय. कोणी अद्यांत अनोळखी साद घालतय. ते पडके बुरुज जे एकेकाळी या स्वराज्याचे खंदे पहारेकरी होते. ती भगवी पताका एकेकाळी अख्या हिन्दुस्तान भर डौलान नाचत होती आणि तिच्या समोर लाखो मस्तक मुजर्यासाठी झुकली होती. 
फ़क्त एका नावान सबंध शरीरात लाव्ह्याची सल भरुन वाहते आणि आजही ज्यांच्या समोर शब्द नाहित तर फ़क्त पाठीचा कणा लवून मुजरे झडतात असे थोरले महाराज आणि ज्या गर्जनेने हजार वाघांच बळ येत ती ' हर हर महादेव ' ची हाक यासाठीच हां सगळा अट्टाहास मांडलाय. आम्हाला खुप काही वेळ असतो म्हणून नाही किंवा आम्ही रिकाम टेकडे म्हणून नाही तर एक वेगळी वाट जी आम्ही बनवलीय, एक वेगळी विचारधारा जी आम्हाला आमच्या शिखराकडे ओढ़त नेते आणि एक जगावेगळे नाते जे कधी तूटणारच नाही. ही संकल्पना कोण्या कथा कादम्बरी किंवा इतिहासातुन आली नाही तर एका सुपिक आणि भटक्या डोक्यातून आलेली आहे. ती तो एकटाच पुढे नेण्यास समर्थ आहे पण जोडीला कोणी असल की प्रवास हलका आणि सुखकर होतो. मग असच एका-मागुन एक असे पाच मित्र एकत्र आले. सगळेच middle class familiar कोणी असा श्रीमंत नाही की कोणी अगदीच गरीब नाही. सगळे लोकल ने फिरणारे, कधी रात्रीच जेवण दुपारीच वा कामाच्या गडाबडीत दिवसभर उपाशीच असेच सगळे. पण डोक्यात विचार मात्र एकाच सरणिचे. एकाला एक भेटला मग अजुन एक कुठून तरी आला कोणी ट्रेक ला भेटला कोणी शिवाकार्यात भेटला असे सगळे एकत्र आले आणि मग पुढे जावून एक पाच बोटांची भक्कम मुठ बनली जिला आम्ही जातिवंत भटके म्हणून नाव दिल.
सह्याद्रीच्या दरया-खोर्यात निर्विवाद आणि मुक्त पाखराप्रमाणे भटकणे, कधी वेळेच भान नाही बंधन नाही. कोणाची भीती नाही , दिवसाचा नेम नाही की रात्रीची भीती नाही, कधी माळावर पाय थकले नाहित तर कधी उंच कड्यावर काळीज बिथरल नाही. आणि या रक्तातील भटकायाची भूक वाढत गेली. आत्ता तुम्ही म्हणाल नुसत भटकण्यात कोणत शहांणपण आलय. पण आम्ही आमच्या भ्रमंती बरोबर इतिहासाची सुद्धा बाजू भक्कम करत आलोय. एकेकाळी याच भूमित मानवी वाघांच्या पराक्रमाचे पाट वाहिले होते त्याची पुन्हा एकदा आम्ही सर्वांना आठवण करून देत आहोत. 
कधी अचानक आलेल्या मदतीच्या हाकेला सुद्धा आम्ही हात देत आहोत तर अचानक येणार्या संकटांना निधड्या छातीने तोंड देत आहोत. आम्ही भटकतो कारण आमचा जिव या दरया खोर्यात आणि सागरी लाटांवर विसावतो. आमच्या सुखद आणि सुरक्षित भविष्यासाठी जे आमचे पूर्वज इथे रक्ताच्या थारोळ्यात हसत हसत निजले त्यासाठी आमचा जीव तड़फतो. एक ना एक दिवस हे सगळ पडून फ़क्त मानवी हातानी आणि राजकारणी डोक्यानी लिहलेल्या मोठमोठ्या पुस्तकात बंदिस्त राहील पण त्याआधी आम्हाला प्रत्यक्ष पहाचय. अनुभवायच आहे. त्याचे तर्क लावायचे आहेत आणि सरते शेवटी अश्याच आमच्या सारख्या भटक्यांना एकत्र करत एका नव्या सुर्योदयाची आणि नव्या विचारसरनीची सुरुवात करून हां वारसा असाच पुढे चालु ठेवायचा आहे. शेवटी आम्हाला कोणी रिकामतेकडा भटका म्हणून संबोधल तरी ते आम्हाला भूषणच आहे. कुणाशी स्पर्धा किंवा कुणाला दाखवण्यासाठी नाही तर आम्हाला आमच्याच रस्त्यावर चालण्याची मस्ती आणि उर्मी म्हणून आम्ही हां सह्याद्रितिल वारा छेडतो तर कधी इथल्या नदित निवांत विहार करतो. कधी या आमच्याबरोबर मग समजेल... 

या पडक्या बुरुजांना कान लावले की खनखनत्या तलवारींचे नाद ऐकू येतात, विजयाचे नगाड़े वाजतात, असंख्य किंकाळ्या ऐकू येतात, हर हर महादेव अशी गर्जना ऐकू येते... कधीतरी वेळ काढावा आणि अशाच अनुभावासाठी रानवाटा तुड़वाव्यात आणि सरतेशेवटी डोळ्यासमोर उंच कातळ कडा त्याला टीचभर सुद्धा न घाबरलेली भेदक नजर बाजुला खळखळ वाहणारा झरा आणि पानांची होणारी सळसळ असा नजारा डोळ्यात घेउन या जगाला आणि या उतुंग आणि बेलाग सह्यागिरिला शेवटचा मुजरा करायचय....

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...