माझ्यासारखे खुपजण नव्या वर्ष्याच्या सुरुवातीस काही न काही संकल्प करत असतात. त्यातील काहींचाच संकल्प पूर्ण होतो आणि उरलेल्यांच्या यादीत माझ्यासारखे भरपूर भेटतील.. याही वर्षी २० ते २५ नवीन गडकिल्ले, धारातीर्थे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याचा संकल्प केला होता पण तो पुन्हा अयशस्वी ठरला. परंतु ह्या भटक्याची भटकंती थांबली नाही. ह्या वर्षी सर्वात चांगली गोष्ट अशी घडली कि गडवाट सारखा गडदुर्गांची ओढ असलेला परिवार मिळाला. अगोदर कोणत्याही ट्रेकिंग ग्रुपसोबत किल्ले फिरायचो किंवा मित्रांसोबत जायचो. आता हक्काचा परिवार मिळाला ज्यातून गडभ्रमंती सोबत समाजकार्याची ओढ लागली. . असो. ह्यावर्षी किल्ल्यांमध्ये वासोटा किल्ला , धारातीर्थांमध्ये तुळापुर (५वेळा) आणि धार्मिक स्थळांमध्ये शेगाव या नवीन ठिकाणाची भटकंती झाली तर या आधी पाहिलेल्या किल्ल्यांवर पुन्हा भटकंती केली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीतील गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अजूनही तग धरून उभे आहेत. मी गडकिल्ल्यांवर का फिरतो हे मलाच न उलगडलेले कोडे आहे. अजूनही आठवतंय ३१ डिसेंबर २००४ साली कॉलेजला बंक म...