Skip to main content

तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग-१ 




खूप दिवसापासून तोरणा ते राजगड ट्रेक करायचा विचार डोक्यात खोळंबून बसला होता. शेवटी ३० डिसेंबर  ते १ जानेवारी पर्यंत हा ट्रेक करायचा निर्णय घेतला. Plan ठरला आणि Event जाहीर करूनहि टाकला. mobile ची रिंग वाजू लागली आणि हळूहळू ट्रेकला येणाऱ्या मुलांची यादी तयार झाली. तोरणागडावर आम्ही मुक्काम करणार नव्हतो (पाण्याची सोय नव्हती म्हणून ). पण ह्याच दरम्यान गडावर भूत असल्याची बातमी आमच्या कानावर येवू लागली. त्यात Height म्हणजे एकाने चक्क मला Message केला कि "भुतांना घाबरताय म्हणून तोरणावर मुक्काम करणार नाहीत का ? " शेवटी 'खाज' म्हणतात ना त्याप्रमाणे तातडीने निर्णय घेवून टाकला कि आता तोरणगडावर आम्ही मुक्काम करायचाच .
वेल्हे गावातील तोरणा विहार हॉटेल चे मालक भाऊ कदम आणि राजगड पायथ्याच्या पाली गावातील तुषार भोसले यांना फोन करून नाश्त्याची व जेवणाची सोय केली. 
२९ ला रात्री ११ वाजता मुंबईहून येणार्यांना ठाणे रेल्वे स्थानकावर भेटायचे ठरले तर ३० ला स्वारगेट स्थानकावर पुणे व इतर जिल्ह्यातून येणार्यांना ५ वाजता यायला सांगितले.
ठरल्या प्रमाणे २९ डिसेंबर रात्री ठाण्याला जायला निघालो आणि मधेच माशी शिंकली. मध्य रेल्वेने आम्हा सर्व मुंबईकरांचा Kandsss केला. शेवटी मरे त्याला कोण रडे तब्बल २० मिनिटे ट्रेनमधेच बसून राहिलो. माझ्याप्रमाणे इतर ट्रेकर्स हि मागोमाग अडकले होते. बरोबर मुलुंड जवळ ट्रेन ने काशी केली. त्यावेळेस लोभेश माझ्यासोबत होता. तसेच ठाणे स्थानकात आमच्या आधी पोहोचालेल्यांचे फोनवर फोन यायला सुरुवात झाली. मग शेवटी वैतागून मधेच उभ्या असलेल्या ट्रेनमधून खाली उड्या घेतल्या आणि आमच्या ट्रेकला सुरुवात झाली तीही चक्क ट्रेनच्या पटरीवरूनच. आधीच १५-२० किलो वजन असलेली sack खांद्यावर टाकून बैलासारखे आम्ही चालतच ठाणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली.


१५ मिनिटांच्या रपेटीनंतर मी आणि लोभ्या ठाण्यात पोहोचलो (वेळ ११.२० मिनिटे). सर्वांबरोबर गाठीभेटी झाल्या. एकतर सर्व ट्रेन उशिरा धावत होत्या आणि Announce करणारी बाई English मध्ये काहीतरी बरळत होती. Indicator वर फक्त शून्य दिसत होते. त्यात सगळ्यांची धांदल उडाली होती तर काहीजण अजून येणार होते. वाट पाहत आणि मनातल्या मनात ट्रेनच्या प्रशासनावर शिव्या देत होतो. ११.१५ ची ट्रेन कधी येणार तेही नीटपणे announce करत नव्हते भय्ये. मधेच announce करणारया बाईला विश्रांती देवून  एखादा पुरुष हिंदीतून हिमेश रेशमियासारखा आवाज काढत announce करत होता.


आता काय ट्रेन पकडून आपण लवकर पुण्यात पोहचू शकणार नाही याची खात्री झाली आणि मग शेवटी एसटी ची चौकशी करायला आबाला पाठवले. आमचे नशिब म्हणून एक एसटी होती पुण्याला जाणारी. आबाने driver ला request करून ती एसटी थांबवली व आम्ही भराभर ऑटो पकडून वंदना येथे पोचलो. त्या गाडीचा conductor खूप खुश झाला होता कारण पावणे एकची शेवटची गाडी त्यात फक्त दोनच प्रवासी होते. आमच्यामुळे चांगला धंदा होणार होता म्हणून २० मिनिटे त्या बहाद्दराने गाडी थांबवली होती. अखेर आम्ही २८ जन गाडीत बसलो आणि पुण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला ( वेळ १.०५ मिनिटे )
३० डिसेंबर पहाटे ४.३० वाजता आम्ही स्वारगेट स्थानकात दाखल झालो. उतरल्या बरोबर आमच्या तोंडाकडे स्थानकातील प्रवाश्यांनी बघायला सुरुवात केली (मोठ मोठाल्या Sack आणि चटई पाहून). तर काही आमच्या गलबलाटामुळे जागे झाले. सर्वाना आपापली नैसर्गिक कामे आटपायला सांगितले. तसे कोण तोंड धुतय कोण ब्रश करतोय त्यात सुशांत दादांनी तर चक्क गुळण्या करायला सुरुवात केली अगदी घरातल्या सारखे. त्यात काहीजण Mobile charging करायला गेले. ५.१५ ला पुण्यातील मुले यायला सुरुवात झाली तसा आमचा दंगा वाढला. काहींची झोप पूर्ण न झाल्याने फलाटावरच पाठ टेकून घोरू लागले. त्यात मी गाडीची चौकशी करून आलो (५.३० मिनिटे). ६.३० मिनिटांनी वेल्हे गावाला जाणारी गाडी फालत क्रमांक १० वर लागणार होती. तसा आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. पुन्हा सगळ्यांनी आपापल्या sack  खाली ठेवून जमिनीवर पाठ टेकली. एक वडाप वाला driver माझ्याकडे आला नि तुम्ही वडापने जावा. लवकर पोहोचाल इतके पैसे द्या. गाडी कधी कधी लागत नाही. अश्या विनवण्या सुरु झाल्या आधी मी दुर्लक्ष केले तरीपण त्याने मला त्याचा संपर्क क्रमांक दिला व निघून गेला. त्याचबरोबर पुण्यातून येणाऱ्या मुलांची संख्याही वाढू लागली. सर्वजन स्थानकात हजर झाले आणि मुलांची संख्या मोजली ( ६.१५ मिनिटे ). पुन्हा एकदा चौकशी केंद्राकडे गेलो व गाडीचा वेळ विचार विचारला.. तसे वेगळेच उत्तर आले. वेल्हे गावाला जाणारी गाडी ८ वाजता आहे.(रविवारी ६.३० मिनिटांनी गाडी नसते याची नोंद घ्यावी). आधी ज्या व्यक्तीला मी गाडीचा वेळ विचारला होता त्याची सुट्टी झाली होती व त्याच्या जागेवर हा शहाणा येवून बसला होता. आधीच आजारी होतो त्यात चीडचीडेपणा वाढला होता. थोडीशी बाचाबाची झाली आमची शेवटी स्वारगेटच्या व्यवस्थापकाकडे जावून विनंती केली कि आमच्यासाठी एसटी ची सोय करावी पण तो सुद्धा तयार झाला नाही. त्यालाही मनातून शिव्या देत  I - Z  करून टाकली व त्या वडाप वाल्याशी संपर्क साधून ३ गाड्या मागवल्या.(त्या वडाप वाल्या ने काहीतरी झोल केला असावा असा दाट संशय मनात येत होता )
 "वाट पाहीन पण एसटी नेच जाईन" हि म्हण आम्हाला लागू झाली नाही कारण वेळच कमी होता. पटापट आम्ही सर्व गाडीत बसलो (कोंबून बसलो होतो) आणि वेल्हे गावाकडे जायचा प्रवास सुरु झाला.(वेळ ६.५५ मिनिटे)

क्रमश:

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...