Skip to main content

|| रायगडाच्या अन राजांच्या भेटीला ||----------


खूप दिवसांपासून रायगडला जाण्याचा बेत होता परंतु कामाच्या रहाट-गाडग्यामुळे तो नेमका फेल जायचा.. आमच्या गडवाटच्या ग्रुपसोबत सुद्धा जाता आले नाही..त्यातच २७ फेबला कुणालच्या लग्नाला रोहा येथे जायचे होते त्यातच सर्दीने घायाळ केल होत पण शेवटी राहविले नाही . मग ठरलं आमच्या सरांकडून सुट्टी मागितली आणि योग जुळून आला. काही मित्रांना सांगितले आणि तेही तयार झाले.मग अडकवली Bag खांद्याला..आणि निघालो राजांच्या भेटीला.. 

२४ फेबला स्वप्नील च्या घरी मुक्काम केला जाताना कुणालला भेटवस्तू म्हणून राजांची प्रतिमा द्यायची ठरली होती.. ती मोठी प्रतिमा घेऊन रायगडलाच जाण्याचा बेत होता पण फ्रेम जड असल्याने तो रद्द केला आणि ती प्रतिमा महाडला अमितच्या घरी ठेवायची ठरली. अमित आणि रत्नदीप आम्हाला महाडला भेटणार होते आणि मी, स्वप्नील मुंबईहून निघणार होतो. महाडला ११ वाजता पोहोचायचं ठरले होते. स्वप्नील साहेबांच मत ST ने जायचं अन माझ मत रेल्वे ने जायचं होत पण शेवटी गर्दीत सर्दी नको म्हणून ST नेच प्रवास करायचा ठरलं.. ७.३० ला पनवेलहून ST पकडली तरीही तिथेही गर्दी पण जागा भेटली आम्हाला कशीबशी. राजांची प्रतिमा आणि माझी Sack Conductor जवळ ठेवून मागे निवांत बसलो. गाडी सुरु झाली आणि नेमकी कर्नाळा घाटात traffic मध्ये अडकली तब्बल अर्धा तासानंतर traffic सुरळीत झाले कर्नाळा किल्ल्याच लांबून दर्शन घेतलं आणि गाडी पेणच्या दिशेने धावायला सुरुवात झाली. आणि एक अशी घटना माझ्यासोबत घडली जी कधीही मी विसरू शकणार नाही, वडखळ जवळ गाडी थांबली वडखळला उतरणारे प्रवाशी बाहेर उतरले आणि उतरताना एका कुटुंबाने conductor जवळ असलेली चक्क माझी bag त्यांची समझुन खाली उतरले.. ते प्रवासी उतरताना आम्ही पाहत होतो पण माझी bag पण खाली उतरतेय ह्याकडे माझ आणि स्वप्नील साहेबांच लक्ष सुद्धा गेले नव्हते.. गाडीची बेल वाजली Driver ने पहिला गेअर टाकला तसा खालून एका १२-१३ वर्षाच्या मुलीचा जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागला " ओ मास्तर गाडी थांबवा bag राहिलेय".. मी आणि स्वप्नील कुतूहलाने तो आवाज ऐकत होतो.. मग मी स्वप्नील दोघेपण तिच्या आवाजात सूर मिसळून "मास्तर गाडी थांबवा कोणाची तरी bag राहिलेय" म्हणू लागलो. फर्लांग भर लांब गाडी गेल्यावर Driver ने रागारागाने गाडी थांबवली. गाडीचा दरवाजा उघडला आणि ती मुलगी म्हणाली मास्तर कोणाची तरी bag आम्ही चुकून खाली आणली. हे शब्द ऐकू आल्यावर मी दरवाज्यासमोर पाहतो तर काय ती bag चक्क माझी होती.. "ओ.. हि माझी bag आहे" अस म्हणत ती bag मांडीवर घेतली व गुपचूप बसलो आणि गाडीत एकच हास्यकल्लोळ माझला. सगळेजन माझ्याकडे पाहून हसत होते आणि मीही त्याच्याकडे पाहून हसत होतो.. निर्लज्जासारखा.. स्वप्नीलला तर महाडपर्यंत माझ्याकडे पाहून हसूच आवारात नव्हते. माझ्या प्रत्येक प्रवासात काही न काही विनोदि गोष्टी घडताच असतात. 
                  अशाप्रकारे कसेबसे तब्बल तीनचार तासात  आम्ही १२.१५ ला एकदाशी महाड गाठले. रत्नदीप आधीच पोहोचला होता तिथे. महाडच्या शिवाजी चौकात अमित आणि रत्तू आम्हाला भेटले तेथून अमितच्या घरी विसावा घेतला. अमितच्या आईसाहेबांनी जेवण तयार करून ठेवले होते. सकाळपासून पोटात काही न गेल्यामुळे तरारून भूक लागली होती. आम्ही चौघांनी पोटभर जेवण केले. जेवण आटपून गाडीची चौकशी केली. रायगडला जाणारी ST ३.३०ला असल्याने चवदार तळ्याला भेट द्यायचे ठरले. चवदार तळे म्हंटले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येणारच. बाबासाहेबांच्या तळ्याजवळ असलेल्या मूर्तीला अभिवादन केले. तसेच तेथे पुस्तकांचे प्रदर्शन भरले होते त्यालाहि भेट दिली प्रदर्शनास ठेवलेली काही पुस्तके मला आवडली व खरेदी केली. २ वाजले  होते म्हणून लगेच लगबग सुरु झाली पुन्हा अमितच्या घरी जाऊन bag घेतल्या आणि जाता जाता अमितच्या आईसाहेबांनी संध्याकाळचा जेवणाचा डबा सुद्धा दिला.. ३.१५ला ST stand वर आम्ही सगळे हजार झालो " किल्ले रायगड" गाडी लागली आणि  ३.३०ला गाडी थेट रायगडाकडे ... ४.३०ला रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. थोडासा नाश्ता केला. जवळच असलेल्या वाघबीळ येथे गेलो वाघबीळ म्हणजे रायगडचे दोन डोळेच म्हणावे लागतील.
                 दुरूनच तो "प्रचंड, अभेद्य, बेलाग दुर्ग-दुर्गेश्वर रायगड" दिसत होता. गड चढण्यास सुरुवात केली कारण सूर्यास्त रायगडावरूनच पाहायचा होता. स्वप्नील आणि रत्तू थकल्यासारखे वाटत होते.. अमित तर काय तिथलाच गड्याने १०-१२ वेळा तरी तो सर केला असावा. सगळ्यांनी झपझप चालायला सुरुवात केली. तीन थांबे झाले असतील आमचे महादरवाजापर्यंत पोहोचायला.. स्वप्नील बंधूनि तर प्रत्येक थांब्यावर कोकम सरबतावर ताव मारायला सुरुवात केली होती गडी जाम थकला होता त्यात पहिल्यांदाच रायगडाला भेट असल्याने त्यांचा पाय काय थांबत नव्हता. रत्तू तर मावलाच झाला होता. मी आणि अमित काही इतिहासाच्या, काही ऑफिसच्या गप्पा मारत गड चढत होतो. पाहुणेसहा वाजता आम्ही माथ्यावर पोहोचलो. गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूने आम्ही सूर्यास्त पाहायला गेलो सगळ्यांनी पटापट bags खाली टाकल्या आणि जमिनीवर ठेक्लो. काही फोटो काढले थोडा वेळ घालवून दरबाराकडे जायला निघालो. महाराजांचे यथेछ दर्शन घेतले आणि होळीच्या मालावर आलो. अंधार पडायला लागला होता. रात्री झोपण्याची सोय करायची होती.                                                  
आधी  गडावरच कुठेतरी राहायचं ठरलं पण काहीच्या सांगण्यावरून आम्ही धर्मशाळेत मुक्काम करायचा ठरवलं. रत्नदीप आणि स्वप्नीलला (थकली होती ) तिथेच ठेऊन मी व अमित जगदीश्वर मंदिरात जाऊन आलो व पुन्हा होळीच्या मालावर चांदण्या रात्रीतहि उठून दिसणारी आणि जिवंत भासणारी महाराजांची मूर्ती पाहत बसलो. १० वाजता आम्ही सर्वांनी जेवण केले व बाहेर येऊन शेकोटी पेटवली. त्यातच विलास घाटगे हे शिवप्रेमी आम्हास येऊन मिळाले इतिहासातील व इतर विषयांवरील खूप गप्पा रंगल्या. १ वाजता आम्ही कुठे झोपी गेलो कारण उद्याचा सूर्योदय होळीच्या माळावरून पाहायचा होता. त्या रात्री मला तरी काय झोप लागली राव स्वप्नीलसाहेब तर असे घोरत होते कि मीच काय अमित,रत्तू सुद्धा झोपला नसेल त्या आवाजाने.
तांबड फुटायला लागल आणि मी अमित होळीच्या माळावर येऊन बसलो महाराजांच्या मूर्तीकडे बघत. जसा जसा सूर्य वर येत होता तशी महाराजांची मूर्तीचे रूप बदलत होते. लगोलागच आम्ही सूर्योदयाचे फोटो काढायला सुरुवात केली. मनभरून महाराजांचे फोटो काढले व थेट बाजारपेठे तून जगदीश्वराच्या मंदिराकडे कूच केली. जगदीश्वराचे मनोपूर्ण दर्शन घेऊन महाराजांच्या त्या पवित्र समाधीकडे वळलो. समाधीचे दर्शन घेताना खरच माझ्या डोळ्यात पाणी तरारले होते. समाधी दर्शन घेऊन घेऊन आम्ही वाघ दरवाज्याकडे जाण्यास निघालो भूक सुद्धा लागली होती म्हणून वाटेत असलेल्या एका घरात झुणका भाकरीची ओर्डर देऊन पुढे निघालो. अर्ध्या एक तासात आम्ही वाघ दरवाजा पाहून पुन्हा वर आलो. पोटभर जेवण केले व थेट टकमक टोकाकडे मार्गस्थ झालो. तिथे जाऊन पुन्हा फोटो काढण्यास सुरुवात केली. काही महिन्या पूर्वीच घडलेल्या एका वाईट घटनेची येथे प्रथमच माहिती मिळाली. पण शेवटी काहीही म्हणा राव " माणसाला टकामका पाहायला लावणारे म्हणजेच टकमक टोक" अस मी म्हणेल.
आता टकमक टोक झाले. मग निघालो पुढे राजदरबारात महाराजांना मुजरा करायला. महाराजांच्या त्या मूर्तीला नमन करून सर्वांनी मोठी शिवगर्जना केली " प्रौढप्रताप पुरंधर राजनीतीधुरंधर सकलगुणमंडळीत क्षत्रियकुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज......." 
सगळा राजदरबार ,राजवाडा फिरलो आता नंतर कधी यायचं ह्यावर चर्चा केली पुन्हा महाराजांना डोळे भरून पाहिलं  आणि परतीच्या वाटेला लागलो.. 

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...