Skip to main content

त्रिंगलवाडी ट्रेक भाग- १



त्रिंगलवाडी… नाव ऐकूनच काही नवे ट्रेकर्स अचाट पडतात. पण गुगल, पुस्तके आणि इतर मित्रांकडून हा एक किल्ला आहे अशी माहिती त्यांना मिळत जाते. येथे कधी जायचे कोणत्या मार्गाने जायचे आणि कोणत्या हंगामात जायचे हे ठरवत एकदाचा तो ट्रेकर जावून येतोच. धुक्यांची नगरी इगतपुरीपासून १०-१५ किमी अंतरावर हा किल्ला आहे. पावसाळ्यात इथला निसर्ग या शहरावर भरगोस कृपादृष्टी दाखवतो. आपला हिरवाकंच शालू सह्याद्रीवर पांघरतो आणि धुक्यांनी ओढून लोकांची नजर चुकवितो. 
इगतपुरी शहरालगत खूप गडकिल्ले पाहण्यासारखे आहेत त्यातलाच एक त्रिंगलवाडीचा किल्ला. 



गडवाटची या पावसाळ्यातील हि पहिलीच गडभ्रमंती….दरवेळी प्रमाणे यावेळी देखील नवी जुनी मित्र मंडळी ट्रेकसाठी इच्छुक झाली… आमचा वैभ्या, पराग मोहिते, जोतीराम सारख्यांनी ऐनवेळी टांग दिली. तर लोभ्या, रविभाऊ शेडगे , सिद्धेश, मंगेश , शंकर बापू यांना खूप Miss केलं. पुण्याहून विशाल आणि रवि आदल्या दिवशीच इगतपुरीत मुक्काम ठोकून होते. "औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणा" इथून प्रतिक, अभिनव, रुपेश, नितीन व प्रशांत यांची Gang रविवारी सकाळी निघाली होती. शनिवारी रात्री Whats App, FB वर सर्वांनी लवकर उठायच्या आणि उठवायच्या आणाभाका घेतल्या. दादर, ठाणे आणि कल्याण असे ईस्टोप ठरले… कशाचं काय आलंय त्यातला एकहीजन दादरला ५.३० ला आला नाही. सकाळी ५.४५ ला एकेकजण हळू हळू यायला सुरुवात झाली. तर काहीं फोन करून "माझी तिकीट काढून ठेव रे" बोलत आरामात येत होते. सकाळी सकाळी वैभ्या Whts App वर सर्वाना पिडत होता. हे बेन झोपेतून ५.३० उठलं होत आणि वरून बोलत होत कि " ६.३० नंतर गाडी आहे काय ? कितीची आहे ? मला वेळ होईल अजून माझी अंघोळ बाकी आहे वगैरे वगैरे…शेवटी आलाच नाही. वसईला राहायला असल्याने त्याला जमले नाही. 
सुशांत भाऊ, विलासराव घाटगे, दीपक, राहुल, हर्षदा, किरण, बापू, रुपेश, देवेंद्र आणि कल्पेश सर्व जन एकत्र आले. राजेश आणि वहिनी आल्या व सगळ्यात शेवटी आला तो योगेश आलेकारी (आरोहीचा जनक). हा without तिकीट होता बर का… सकाळी ६.२३ मिनिटांनी असलेल्या तपोवन एक्सप्रेसने आमचा प्रवास सुरु झाला. संदीप दादा नेरूळहून बसने ठाण्यात येत होते. तर ठाण्यातून संदीप दादासोबत आबा, राम, विक्रांत, रोहिणी, पुनम, चिन्मयी,अक्षय, संतोष, निलेश, रवींद्र सावंत,प्रशांत, स्वप्नील, संकेत, योगेश हांडे, सुरज… कल्याण वरून विठ्ठल, अनिकेत वाघ, विशाल सुर्वे, विनायक, हर्षल, शैलेश… कासाराहून दत्तू भवारी सर, भगवान नागपुरे काका, संदीप ठिगळे आदि सर्वजण गाडीत चढले. कसारा घाट सुरु होताच पावूस सुरु झाला होता. दादरहून सुरु झालेली धमाल इगतपुरी पर्यंत चालूच होती. 



९ वाजता आम्ही इगतपुरी स्थानकात उतरलो. आम्हाला त्रिंगलवाडीस नेण्यासाठी येणारे पिकअप चे चालक वेळेत हजर होते. ठरल्याप्रमाणे राहुलने उडपीच्या हॉटेलात नाश्त्याची ओर्डर देवून ठेवली होती. सर्वांचा यथेछ नाश्ता चहापाणी झाला. नाशिकचा अमित कानडे सर्वांची खास भेट घेण्यासाठी आला होता. औरंगाबादकर १० वाजता वेळेवर आले. (प्रतिक <3 ). आम्ही एकूण ४६ जन होतो आणि २ गाड्या होत्या. ST योग्य सोय नसल्याने पर्याय नव्हता तरीही सर्वांची धमाल होणार होती त्या गाडीतून सैर करून. कोणी driver च्या बाजूला, कोणी मधे, कोण मागे, कोणी गाडीच्या टपावर, तर कोणी गाडीमागे लटकण्यासाठी जागा पकडली आणि आमचा प्रवास सुरु झाला. राहिलेली बाकीची मंडळी थेट गावातच भेटणार होती. वाघोली खिंडीच्या खडतर, ओबडधोबड घाटातून, निसर्ग, धबधबे न्याहाळीत सफर सुरु झाली. कॅमेऱ्याचा क्लिकक्लीकाट सुरु झाला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जमिनीत शेतकरी नांगरत होता, पोर खेळत होती आणि तर कुठे एका तालात गावातील महिलांची भातलावणी सुरु होती. हिरवेगार वातावरण, थंडगार सुटलेला वारा, मधेच भिजवून जाणारा पाऊस आणि पावसाला मागे सारून पडणारे उन सुखावत होते. १०-१५ किमीच्या प्रवासानंतर आम्ही त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. तिथेच ईश्वर सहाने आणि त्यांचे मित्र यांची भेट झाली. गावातल्या शाळेजवळ सर्वांची ओळखपरेड झाली. ईश्वर बंधूनी गडवाटचा नाशिक जिल्ह्यातला पहिलाच ट्रेक म्हणून सत्कार केला. मुलीना शिवप्रतिमा भेट दिल्या. भवारी सर त्यांच्या सहकुटुंबासोबत गडाच्या पायथ्याला असलेल्या पत्र्याचीवाडी गावात वाट पाहत होते. त्यांनी थेट तिथेच गाडीने या म्हणून सांगितले तसे सगळे पुन्हा गाडीत बसले. जाता जाता लक्षात आले कि मल्हार(शिवकवी अक्षर) मागे राहिला होता. हा गाडी आदल्या दिवशीच घोटीत आला होता तरीही मागेच राहिला. शेवटी आबाला गाडीवरून त्यास आणायला पाठवले व आम्ही पुढच्या मार्गावर निघालो. 



त्रिंगलवाडीतून गडाचा पायथा गाठायला ३-४ किमी चा पल्ला गाठावा लागतो. काही वेळातच पत्र्याचीवाडी गावात आम्ही पोचते झालो. किल्ला स्पष्ट दिसत होता. थोडे ऊन पडले होते. जवळच कावनई किल्ला दिसत होता तर त्रिंगलवाडी किल्ला साद देत होता. भवारी सरांची भेट झाली. घड्याळात ११ वाजले होते. उशीर न करता आम्ही गड सर करायला सुरुवात केली… विठ्ठल व बापूला लीड करायला सांगून मी आबा आणि मल्हारची वाट पाहत हळू हळू पुढे चालत होतो… 

क्रमश: 

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...