आमच्या पायाला घरी थांबवत नही आणि मन तर २४ तास सह्याद्रीच्या डोंगर-दर्यात आणि नदी-वार्यावर फिरत असत. त्यात एखादा रविवार सुट्टी घेण म्हणजे आयुष्याचे नुकसानच. असो.
सह्यगिरि रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ' कळसुबाई ' ( तस कळसुबाई दुसर्यांदा ) म्हणजे सोन्याहून पिवळ.
ठरल...ठरल..ठरल... अनेक अडचणी नंतर रात्री अखेर गाड्वाटची बस पकडली. प्रवास करत नाशिक महामार्गावरून बारी गावाच्या वेशीवर आलो. कमानी खाली बस उभी केली आणि गावात शिरलो. मी सुहास आणि विठ्ठल.. काय रस्ता..भारीच.. कोणी ' गोरक्ष ' कडे व्यवस्था केली होती. बर आमची आणि त्या गावच नशीब थोर म्हणून कि काय त्या गावात प्रत्येक घरात एक ' गोरक्ष ' नावाचा माणूस.. सगळ गाव कोंबड्याच्या आधी आम्ही जाग केल... " कोण आहे का..?? गोरक्ष इथेच राहतात का.? " मग फुल पोझ मध्ये आतून पुरुष उठून येणार... ' कोन..ते गोरक्ष का..? कंच्ये..? खाडे कि आडार..?? ' हा ते तिकड खाली राहतात..जावा तिकड..' हे अस.. शेवटी तो गोरक्ष काही भेटला नाही. परत आलो बस जवळ. बाहेरच बसून आभाळ न्याहळत.. चंद्राची कोर जणू १६ वर्षाच्या तरुणी प्रमाणे चालत होती आणि पहिला कोन पकडणार याच उत्सुकतेने सारे ढग तिच्या मागे धावत होते.
बरोबर ६ वाजता ' गोरक्ष ' आला. मग सर्व जण त्याच्या घरी गेलो...आवरा-आवर करून..नाष्टा करून ओळख तास संपला... आणि हर हर महादेव गर्जनेने मोहिमेला सुरवात केली.
गाव सोडल्यावर अनोखा नजरा पहायला मिळतो. धुक्यांनी कळसुबाई ला पांघरुन घेतलं आहे आणि तो अवखळ वारा ते पांघरूण उडवण्याची गुस्ताखी करतो आहे.
थोड चालत वरच्या दिशेन गेल की एक मंदिर आहे. कळसूबाईच तिथे पुजारी असतो. नंतर पुढे चालत गेल की छोटी सपाटी लागते. तिथून उजव्या बाजुला माकड कडा दिसतो आणि डाव्या बाजुला डोळ्याच पारण फेडणारा बेलाग सह्याद्री.. तिथे पोहोचल्या पोहोचल्या लगेच छायाचित्रकारांचा किलकिलाट चालु झाला. इकडे पड़, तिकडे पड चालू झाल. आम्ही थोड मागुन येणार्यांची वाट पाहत थांबलो होतो. शेवटची टोळी आली आणि एक फक्कड सामूहिक फोटो झाला. सुहास आणि राजोसरांनी थोड़ी माहिती ही दिली . डाव्या बाजुला नजरेसमोर पुसट पट्टा किल्ला दिसत होता. त्याच्या अलीकडच्या डोंगरावर पवनचक्की प्रकल्प होता वार्याच्या प्रवाहाबरोबर पाती मंद गतीन फिरत होती. पुढे चालत जाउन मग Rock Patch आहेत तिथे लोखंडी आधार केले आहेत. तो थोड़ा नागमोडी रस्ता आहे. आम्ही सर्वात आधी जावून वरून पाहत होतो. तर सारी पोर एकामागेएक अशी येत होती. जणू त्या हिरवळीवर रंगरंगेबी माळ कोणीतरी ओढ़त आहे असा भास् होत होता. पहिल्या शिडिच्या इथे सर्पराज्यांच दर्शन झाल. मग काय तो साप म्हणजे जगातला शेवटचा साप असाच समजुन त्याची फोटोग्राफी चालु झाली. ' हरणटोळ ' जातीचा सर्प होता. महाराष्ट्रातील विषारी जाती पैकी एक जात. पुढे ते रेलिंग संपल्यावर मुख्य शिखरापासुन 30 मिनी अंतरावर आमचा पडाव पडला. तिथून धुक्याच्या आडून लपाछपी खेळणारे डोंगरातील सुळके , अर्ध्यावरून नाहीसे होणारे धबधबे , ताशिव कड़े , हिरवीगार गालिचा अंथरलेली दगड वजा उतार भाग आणि त्यावर साजुक हातानी नक्षीकाम कराव अशी उगवलेली सहयाद्रितील रानटी फुले. सर्वजण निसर्गाच न पाहिलेल रूप डोळ्यात साठवत होते कोणी cameras मध्ये कैद करून घेत होत आणि काही ख़ास लोक त्यांच्या कवितांसाठी त्याची बारीक परीक्षा करत होत.
हा सह्याद्री खरच वेड लावतो राव.. माझा तर दरवेळचा हां अनुभव आहे. या डोंगरात कधीही या नेहमी तुम्हाला पहिल्यांदाच आलो असा भास् होत राहतो. नुसत्या मराठी मनालाच नाही तर फिरंगी हृदयाला सुद्धा भूरळ पाडली आहे. म्हणून तर असंख्य परदेशी ट्रेकर्स आणि पर्यटक येतात.
तिथे एक ग्रुप फोटो झाला. चढण चढून गेल्यावर एक छोटी विहीर आहे. निव्वळ अमृत तुल्य पाणी पिऊन पायथ्यापासून करत आलेली पायपीट , दमछाक सगळी एका घोटात शांत केली. तिथून 15 मिनी चढण चढली आणि एक डुगडुग शिडी चढली आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचलो..
हुश्श्श्श्श्श्श्श्श........... Top of Deccan Hills खुप जिव शांत झाला. degree पूर्ण झाल्याची आनंद छटा चेहर्यावर उगवली. तिथे थोड खाऊन पिऊन मग ' कळसूबाई ' याची कथा किंवा इतिहास वजा दंतकथा रोहिणी ने खुप आर्जव आणि मस्का लावल्यावर सांगण्यास सुरवात केली.
प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती.
ती पाटलाच्या घरी कामाला होती.
कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट
घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे
सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर
पाहुणे आले, पाटलाने
कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून
कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच
कळसूबाईचा डोंगर होय. असच काहीतरी होत. नंतर सुहास पवार ने संपूर्ण तिथल्या त्या देवळाची आणि उत्सवाची माहिती दिली. इकडे तिकडे , काही ख़ास ठिकाणी ख़ास पोझ मध्ये फोटो वैगरे काढून परतीचा प्रवास चालु झाला.
खाली उतरताना राहुल ची ' टिक टिक ' , योगेश चे जोक्स , मल्हार ची झोपोग्राफी , चिनु चे silent जोक्स , रोहाची बडबड , संकेत चे MacDonald , रुपेश च सुपरमन वाल रूप आणि बापू ची ' Life बना दूंगा ' आणि ख़ास आकर्षण ' चावरे बाबा ' यांच्या नादात पायथ्याला कधीच पोहोचलो. जेवण करून आम्ही वेळ उरला म्हणून बोनस गिफ्ट ' रंधा धबधबा ' पहायला गेलो. खुप सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ . लयच भारी बोनस मीळाला. बस मध्ये बसून आम्ही फुल फटांग हिंदी-मराठी गाण्यावर घराच्या दिशेने चलते झालो.
आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही त्या विधात्याचे देण लागतो की त्याने आम्हाला या दख्खन च्या भूमीवर जन्मला घातल. आम्ही खुप भाग्यवान आहोत की मर्द मराठ्यांच्या उंबर्यावर जन्माला आलो. या सह्याद्रीच्या कुशीत खेळलो वाढलो आणि जगलो सुद्धा..
परतीच्या प्रवासात खुप आठवणी मनातून slide show सारख्या जात होत्या. त्याच आठवत आणि एकटाच मुर्खासारख हसत घरी परतलो.
खूप वर्षापासून केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक ) राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...
Rocking experience for me too....पण रंधा धबधबा पाहायला जात असता आपला एक हिरो गाडीतून पडला यार.....नशिबाने काही लागले नाही म्हणून ठीक आहे..पण पुढच्या वेळेस याबाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. Pano Master ची धावपळसुद्धा खूप महत्त्वाची होती.
ReplyDelete