सर्व trekkers मित्रांना एक विनंती
काही दिवसांपूर्वी एक गिर्यारोहक गडप्रेमी असलेल्या कोण्या एका ट्रेकर मुलाचे फोटो पाहिले ( नाव गुपित ठेवण्यात आले आहे ) त्या मुलाने हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याच्या धोकादायक रेषेपुढे आपले फोटो काढून मोठा पराक्रम गाजविला आहे... त्या फोटोत अक्षरश: "खतरा" असे वाक्य धोकादायक रेषेवर लिहिलेले नावही दिसत आहे...
सह्याद्री... डोंगर द-या, कडेकपारी, ओढे नाले, गड किल्ल्यांनी नटलेला राकट पैलवान... त्याच्या अंगाखांद्यावर बिनधास्त भटकताना तो आपणास कधी धोबीपछाड देईल सांगता येत नाही... खर सांगायच झाल्यास सह्याद्रीत फिरताना स्वत:सोबत इतरांचीही काळजी घ्या... तुम्हा सारख्यांची प्रेरणा घेऊनच नवीन मुलांचे पाऊल गडकिल्ल्यांकडे वळत आहे.. तुम्ही प्रस्तरारोहण करत असाल किंवा एखाद्या कड्याच्या, अवघड जागेच्या ठिकाणी काढलेल्या फोटोखाली तुम्ही घेतलेल्या खबरदारीची माहिती जरुर द्या... किंवा असे फोटो फेसबुकवर पोस्ट करणे टाळा..... उगाच असे photo post करून मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा तुमचे हे photo बघुन एखादा तसच करण्याच्या नादात आपला तोल गमावून बसतो आणि कदाचीत प्राणही.
बघा विचार करा......पटतयं का तुम्हाला ??
मिञांनो वरील केलेल्या विनंतीची, आवाहनाची जबाबदारी निरपेक्षपणे पाळाल अशी अपेक्षा करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, सह्याद्रीचे सौंदर्य जरूर न्याहाळा पण योग्य ती दक्षतादेखील बाळगा. निसर्गाच्या पुढे आपण केव्हाही खुजेच आहोत आणि खुजेच राहणार.
सह्याद्री... डोंगर द-या, कडेकपारी, ओढे नाले, गड किल्ल्यांनी नटलेला राकट पैलवान... त्याच्या अंगाखांद्यावर बिनधास्त भटकताना तो आपणास कधी धोबीपछाड देईल सांगता येत नाही...खर सांगायच झाल्यास सह्याद्रीत फिरताना स्वत:सोबत इतरांचीही काळजी घ्या...तुम्हा सारख्यांची प्रेरणा घेऊनच नवीन मुलांचे पाऊल गडकिल्ल्यांकडे वळत आहे..तुम्ही प्रस्तरारोहण करत असाल किंवा एखाद्या कड्याच्या, अवघड जागेच्या ठिकाणी काढलेल्या फोटोखाली तुम्ही घेतलेल्या खबरदारीची माहिती जरुर द्या... किंवा असे फोटो फेसबुकवर पोस्ट करणे टाळा..... उगाच असे photo post करून मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा तुमचे हे photo बघुन एखादा तसच करण्याच्या नादात आपला तोल गमावून बसतो आणि कदाचीत प्राणही.बघा
विचार करा......पटतयं का तुम्हाला ??
मिञांनो वरील केलेल्या विनंतीची, आवाहनाची जबाबदारी निरपेक्षपणे पाळाल अशी अपेक्षा करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, सह्याद्रीचे सौंदर्य जरूर न्याहाळा पण योग्य ती दक्षतादेखील बाळगा. निसर्गाच्या पुढे आपण केव्हाही खुजेच आहोत आणि खुजेच राहणार.
Comments
Post a Comment