Skip to main content

सहयाद्री तुमचा बाप म्हणून काळजी घ्या.

काही गोष्टी-ठिकाण अविरत दिमाखान स्वतःच वेगळपण टिकवून ठेवत असतात. बदलते हवामान, ऋतु , नक्षत्र, नैसर्गिक आपत्ती इ गोष्टीत सुद्धा त्या कणखर आणि अनुभवी तेजपुंज तपस्वी प्रमाणे मानेच शिखर उंच ठेवत असतात. आपण विचार करतोय तो बेलाग, अमर्याद निसर्ग संपत्ती, उंच उंच शिखर, काळ्या कातली निर्जन जागा, लांबच लांब पसरलेली रान आणि त्यांच्या पोटात कोळ्याच्या घरट्याप्रमाणे कोरलेल्या रानवाटा आणि कुठे एखादा जीरे टोप घालून त्यात मानाचा तुरा खोउन आपल वेगळेपण दर्शवणारा स्वराज्याचा साक्षीदार एखादा किल्ला-गड-दुर्ग.

'महाराष्ट्र हां दुर्गांचा देश आहे. दोन-चार डोंगर उतरून गेल की एखादा डोंगर डोक्याला तट-बुरुजांच शेले-पागोटे बांधून उभा असतो.' अस महान भटके-लेखक म्हणतात ते खरच. यातील अनेक दुर्गांनी शिवछत्रपतींच्या चरणाची धुळ सुद्धा आपल्या ललाटी फासली आहे. यांचे स्वातंत्र्य टिकवाया अनेक सह्यपुत्रांनी रक्ताचे सडे शिंपले आहेत त्यांच्या अद्भुत पराक्रमानी हां हां अखंड सह्याद्री आजही त्यांची थोरवी गातो...ती ऐकू येते..आजही..कधी घराबाहेर पावल नेउन पहा,या सह्याद्रित जा, फिरा आणि ऐका. आजही हां पुराणपुरुष त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गातो आहे. 

जाने या सह्याद्रिशी सलगी केली त्यानेच आयुष्य जगले. तो नेहमी तुम्हाला नव्या-नव्या गोष्टी शिकवत असतो. तुम्हास साहाय करत असतो म्हणुनच तर त्यास कदाचित ' सह्याद्री ' म्हणत असतील. पण आत्ता खरा सह्याद्री आपल रुप घेत आहे. ज्यांनी तळपत्या उन्हात सह्याद्रिचा राकट पणा पाहिला त्यांनी पुन्हा आपल्या नजरा या खोर्यात फिरवा. काही दिवसा पूर्वी राकट वाटणारा सह्याद्री आत्ता लोभस आणि मन मोहवून टाकेल अस नव्याने रुप परिधान करत आहे. टेकडीवर उभ राहून डोळ्यानी पाहता डोळे सुखावतील अशी हिरवी शाल ओढून हा सह्याद्री नव्या उमेदी तारुण्यात शोभतो आहे. पावसाची रिमझिम सर, धुकट दिसणार्या पर्वत रांगा, घाटात शिवा-शिव-लपाछपी खेळणारे पांढरे शुभ्र ढग, कड्याच्या खांद्यावरून कोसळणारे दूधसागरी धबधबे. सगळ कस नविनच असल्याप्रमाणे. तुम्ही आठवड्याची सुट्टी काढून एकदा धूरस झालेल्या वाटा पुन्हा चालून काढा. धबधब्यांच्या थंडगार अमृततुल्य पाण्याची तुमच्या शिरावर धार घ्या मग बघा कसा सगळ्या वर्षातील ताण पाण्यासरशी वाहून जातो. हे शत-प्रतिशित खरच आहे. 

आम्ही अनुभव घेतला आहे तुम्ही ही घ्या.

रायगडचे उंचच उंच कड़े जिथे गवत सुद्धा उगवत नाही तिथला पाउस म्हणजे उडत्या पाखराच्या पंखावर सुद्धा शेवाळ धरेल. वाटा काढत भीमा-शंकरचे जंगल बघा तिथल्या झाडांची ऊँची म्हणजे आभाळ ठेंगणे, प्रबलपठावरुन एरव्ही दिसणार कलावंतींनी च टोक आज शोधून दाखवा असा ढगांचा ढिगारा असेल, कळसूबाई च्या एरव्ही शिखरावरून दिसणारा राकट सह्याद्री आज मात्र दिसणार नाही एव्हढी धुक्याची गर्दी असेल, पेब-विकटगडाचे उलटे वाहणारे धबधबे, माथेरान जंगलाचा सर्वाधिक पडणारा पाऊस पण घाटात चहा आणि भूट्याची मजा घ्या, कोकणात गेलात तर कोसळणार्या पावसात आरावलीच्या गरम कुंडात नक्की डुबक्या मारा, परशुराम घाटात वाशिष्ठी चे थोरले पात्र पहा, निवली धबधबा, भाट्याचे सुंदरबन, राजापुरचे धुतपापेश्वर अजुन काय काय सांगावे. तुम्ही मनापासून भटका पण काळजी घेउनच. ' जान सलामत तो जिंदगी हजार साल '. आपल्या लोकांची पावसाळ्यात कालजी घ्या, सह्याद्रीत फिरताना कचरा मात्र नक्की करू नका. त्याचे सौंदर्य अबाधित राखा. 

सहयाद्री तुमचा बाप म्हणून काळजी घ्या. 

इथे नाही कमी सौंदर्य त्या मेघांचे
अविरत वाहती झरे त्यात शुभ्र दुधाचे
मान्सून पहावा ऐसा या कड़े-कपारीतुन
सह्यपुत्र आहोत आम्ही त्या पुराण सह्याद्रीचे

- जातिवंत भटके

जय शंभू महादेव.

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...