Skip to main content

निसर्गाशी ऋणानुबंध

दिवसागणिक दिवस जात असतात. काम, घराच्या जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य यातून फारसा वेळ मिळतच नसतो. त्यात सगळच वेळेवर होत अस नाही म्हणजे आमच्या आयुष्यात कधी झालच नाही. पण म्हणून निराश होण हे शेवटच कारण नाही. निराश कधी झालोच नाही. कधी थांबलोच नाही. कधी मागे फिरुन पाहिलच नाही. जे आहे त्यांना घेऊन चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत राहिलो, प्रसिद्ध नाही झालो, पण सिद्ध झालो. तो या भटकंती मुळेच.

निसर्गाशी असलेला रुणानुबंध आणि रक्तातील तेज जागवुन ठेवण्यासाठी भटकंती शिवाय दूसरा पर्यायच असू शकत नाही. स्वावलंबन, आत्मविश्वास, साहस, जिद्द, बंधुभाव, समजुतदारपणा, तडजोड, ध्येयासक्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटांशी मुकाबला एवढं सगळ कमवल ते या सारासार प्रपंचातुन. कधी स्पर्धा केली नाही पण म्हणून आव्हान उडवली सुद्धा नाहीत. ती पुरेपूर पेलुन धरली. वेळेच बंधन तर नव्हतच आणि आर्थिक अडचण ही भासली नाही, तशी भासूच दिली नाही कारण ' शेजाऱ्याच पोर पाजाऱ्याकड़े ठेऊन शौक करण ' आमच्या हिशोबात नसत. 


या निसर्गान अर्थात सह्याद्रीन त्याच्या अष्टपैलू सौंदर्यान मोह घातला आहे तो सुटने शक्य नाही. निसर्गाच रौद्ररूप, अक्राळविक्राळपणा, कधी भीषण वादळवाऱ्यांची व धुंवादार पावसाची गाज, वैराण भगभगित उन्हाचे चटके, कातळ-दऱ्या-सुळक्यांमधून आपल पिळदार, राकट पुरुषी सौंदर्य दाखवतो तर दुसरीकडे सूर्यास्ताच्या रंगबिरंगी छटांच मनोहरी दर्शन, मोकळ्या पाठीवर सोडलेल्या लता-वेली-झऱ्यांमधून जंगली हिरवाईच तारुण्य दाखवतो.



या छंदामुळे निसर्गाच्या निकोप निरोगी, विराट-बेलाग रुपाच एवढं दर्शन घडत की सगळा अहंकार, आढ़यता सार काही त्याच्या समोर गळून पडत. अस म्हणतात की या उत्तुंग आणि ऊंची पुढे आपल खुजेपण दिसत. ही ऊँची दाखवून देते. पण तरीही कौतुक याच आहे की या सर्वांवर मात करण्याची ईर्षा...!! आणि याच इर्शेतुनच जन्माला आला आहे हां भटकंतीचा-गिरीभ्रमणाचा छंद. आणि याच आता व्यसन लागलय आणि आई म्हणायची, " घेतलेला श्वास आणि लागलेल व्यसन मेल्याशिवाय सुटत नाही आणि जे सुटत ते व्यसन नाही...!!!"






Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...