Skip to main content

Posts

Showing posts from 2017

अपरिचित मराठवाडा । भाग : १

या ३ दिवसाच्या प्रवासाची सुरुवात नक्की कशी व कुठून करावी हे आता लिहिताना सुचत नाहीये. ऑगस्टमध्ये झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती नंतर काही महिने? आराम करावा, आता घरादाराकड अन कामाकडं लक्ष द्यावं, दुनियादारी बंद करून संसाराला लागावं वैगेरे विचार येऊन गेला. त्यानुसार दोन महिने पूरेपूर प्रयत्न केला गेला. आज्याबात कुठंच गेलो नाही असं म्हणताना आज स्वतःलाच हसू येतंय. सप्टेंबर मध्ये प्रथमोपचार शिबीर सोडलं तर कुट्टच गेलो नव्हतो.  मागच्या महिन्यातच बाकीच्या टाळक्यांचा दसऱ्या निमित्त यावर्षी मराठवाडा भागातील भुईकोट किल्ले भ्रमंतीचा प्लॅन ठरला होता. दसरा, रविवार आणि गांधीजींची जयंतीनिमित्त लागोपाठ आलेली सुट्टी, तीन दिवसाच्या  प्रवासाच ठरलेलं नियोजन.  महिनाभर आधी ठरलेल्या या ट्रेकला न जायचाच ठाम निर्णय घेतला होता. गेल्याच आठवड्यात धाडकन या निर्णयाचा इस्कोट झाला. शेवटच्या घडीला या ट्रेकला जायचच हा निर्णय अंमलात आणला. स्वतःसाठी वेळ काढत जमेल तसं मी सह्याद्रीत फिरतोय. आतापर्यंतच्या या प्रवासात मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकण पाहिलं होतं पण मराठवाडा परिसर आजवर पाहिल...

निसर्गसुंदर गाढेश्वर

परवा दिवशी विक्रांतसोबत नुकताच पनवेल जवळील माझ्या आवडत्या गाढेश्वराच्या दर्शनासाठी गेलो होतो. खारघरमधून गाडी जशी मोठ्या रस्त्याला लागली तसा वारा पिल्यासारख भन्ना...

रंग दक्षिण दौलतीचे, रुबाब नव्या भटकंतीचे...

सुट्टीवर आल्यावर किरकोळ भटकंती चालूच होती. काहीतरी मोठा प्लॅन माझ्या डोक्यात चालूच होता. दरवर्षी एक राज्य फिरायचं असा प्लॅन सध्या माझा ठरला आहे. मग यावेळी राजस्थान आणि चेन्नई हे दोन प्लॅन डोक्यात होते. त्यात आमच्या साधे-सुधे ट्रेकर्स ग्रुप ने आधीच जिंजी चा प्लॅन ठरवला होता.मग त्यांच्याबरोबर जायचं पक्कं झालं आणि तयारीला सुरवात झाली. खरेदी-आवश्यक रूट, खर्च आणि कोणकोण येणार याबद्दल चर्चेला उधाण आलं. व्हाटसअँप्स ला ग्रुप होऊ लागले. रोज नवे-नवे आराखडे तयार होऊ लागले. दुचाकी वरून भ्रमंती म्हटल्यावर बाईक ची सर्व्हिसिंग, छोटा-मोठं काम करून घेतलं, विमानाच्या तिकिटाचे बुकिंग वगैरे होऊन ९ जाने २०१७ ला बाईक ट्रान्सपोर्ट ला दिली आणि मग उत्सुकता लागली ती १४ जानेवारीच्या रात्रीची. शेवटी उत्सुकता संपली आणि दिवस उजाडला. नवी-मुंबई हुन मी अन सूरज सकपाळ होतो, ओला करून आम्ही विमानतळावर पोहोचलो. त्यात नवीन आणि पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणारे सगळेच म्हणजे मी आणि विलासदादा सोडून. तर सगळा विमानतळावरील लगेज-सेल्फीचाळे सर्वांचे आटपल्यावर आमचं चेन्नई एक्सप्रेस च विमान ९.४० ला उडालं आणि आमची भ्रमंती हवाई मार्...

SMS Trek...साल्हेर मुल्हेर सफर...

गेल्या काही महिन्यांपासून लिखाणाला पूर्णविराम दिला होता. एखाद्या गडभ्रमंतीनंतर संपूर्ण प्रवासवर्णन लिहायचा असाच शिरस्ता ठेवला होता. कारण प्रवासवर्णन लिहिण्यामागे माझी स्वार्थबुद्धी लपली आहे एक तर जेव्हा पाय चालायचे थांबतील तेव्हा हेच प्रवासवर्णन पुन्हा वाचून काढायचे आणि आठवणी जागृत ठेवायच्या आणि दुसरे एखाद्या नवीन भटक्यास प्रवासवर्णनाद्वारे थोडीफार माहिती मिळेल किंवा ते देखील अशी प्रवासवर्णने लिहायला प्रेरित होतील. कारण मी देखील अशाच ब्लॉगरद्वारे प्रेरित झालो.     तीन दिवसांपूर्वी नुकतीच साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांस भेट देवून परतलो. गडवाट प्रवास सह्याद्रीचा संस्थेतर्फे गेली 5 वर्षे वर्षाखेरची भ्रमंती आयोजित करण्यात येते. आतापर्यंत गेल्या पाच वर्षात तब्बल ७० हुन अधिक गडभ्रमंती मार्फत नव्या तसेच जुन्या पिढीला महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास प्रत्यक्ष स्थळास भेट देवून अनुभवण्याचा प्रयत्न गडवाट संस्था करत आहे. किल्ल्यांवरील भ्रमंतीद्वारे नवनवीन मित्र तर भेटलेच परंतु त्यातून काहीतरी वेगळे करत गडकिल्ल्यांवरील स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्...