Skip to main content

क्रांतीदिन विशेष- मराठ्यांची रणांगणे - उंबरखिंड

खुप दिवस सुहास बरोबर भटकंती झाली नव्हती. त्यात रविवार भेटला तो सुद्धा अर्धा. त्यात हे महाशय ऑफिसच्या आउटडोर ट्रिप साठी जाणार होते. साल्यान मला रात्री सांगितल नाही कुठे जाणार ते. पण दुसऱ्यादिवशी कॉल आला बोलण नेहमी प्रमाणे," भटक्या आहेस कुठे..? लगेच ये मी कंटाळलो आहे इथे." 
मी म्हटल," ते ठीक आहे पण येऊ कुठे...?" तस मी याला कुठे-कशाला-काय आहे-कोनासाठी-काय मिळणार-कस जायच हे असेल फालतू प्रश्न विचारत नाही. 
उत्तर," एक्वा इमजीका ला ये." 
आईशपथ सांगतो एवढा हसून हसून मेलो असेल ना मी. Bc तू काय तिकड करतोय...:p 
" कराव लागत बाबा नोकरीसाठी...." 
मी म्हटल बर येतो आपण उंबरखिंडीला जाऊ. आणि बाईक ला स्टाटर मारून मी सुटलो. तिथे जावून पाहिल तर अजुन एक परिवार होता त्यांना तस काहीच माहिती नव्हतं त्या स्मारकाबद्दल. सुहास ने खुप सांगितल. आमच्याबद्दल सांगितल. आमच्या गडवाट बद्दल सांगितल. आम्ही काय कस कोणासाठी करतो हे सुद्धा सांगितल. अस हे सगळ बोलताना सुहास एका वेगळ्याच विश्वात निघुन जातो. आम्ही मग गारद सुद्धा दिली. त्यांनी आमचा हात हातात घेऊन डोक्याला लावला. भरुन आला आम्हाला आणि भरुन सुद्धा पावलो. 
" आज वीकेंड ची सुट्टी नशेत धुंदीत घालवणारे तरुण कुठे आणि तुमच्यासारखे इतिहास-भटकंतीची नशा करणारे कुठे..." दिवस सत्कारणी लागला आमचा. येताना मल्हार रावांनी उत्तम आईच्या हातचे पोहे खायला घातले आणि दिवसाची सांगता केली. 

उंबरखिंडीचा इतिहास हां असा थोडक्यात- 

मराठ्यांची राणांगणे 

उंबरखिंड 

खासा शाहिस्ताखान स्वराज्यावर चालून आला असता त्यास रोखण्यास खुद्द महापराक्रमी शिवाजी राजे पन्हाळ्याहून शर्थीन सुटेल आणि सरळ खानचा समाचार घेण्यास सेना लावल्या. शुर वादळाचा सेनापती नेताजी पालकर याच्या अधिपत्याखाली सेना खानाला त्रास देऊ लागल्या. चाकण सारखा भुइकोट घेताना शास्तखानाच्या नाकि पाणी आले. त्यात बादशाहचा रोजच्या दबावामुळे त्यानं कोकण मोहीम आखली आणि सह्याद्रि चढण्याची तैयारी केली. या ख़ास मोहिमेसाठी कारतालब गाजीखान ला प्रतिनिधी केला. सोबत महाबलवान कछप व चव्हाण अमरसिंग, मित्रसेन व त्याचा भाऊ सर्जेराव गाढ़े, युद्धामध्ये वाघिणीप्रमाणे निर्भय अशी जी उदारामाची बायको व जगजीवनची आई रायबागीण साहेब, जयवंत कोकाटे, महाबाहु जाधव असे विचारी योद्धे दिले. लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गावरून मोगल सैन्य खाली सरत्या वाटेनी उतरु लागले. रान एवढं मोठ की वारा सुद्धा नव्हता. वरुन सूर्य सुटला होता. या आड़ वाटेवर एखादा जंगली माणूस सुद्धा धडपडतो तिथे खान आणि पाठीराखे तीस हजाराची फ़ौज घेऊन घुसले होते. 
रायबागीन या रौद्र सह्याद्रिची जाण ठेऊन होती तिने वारंवार खानाला समजावल पण उन्मत्त झालेला खान ऐकत नव्हता. 
खान उंबरखिंडीतून उतरणार होता याची महाराजांना आधीच कल्पना होती कारण त्याला तिथुनच उतरण्यास भाग पाडले गेले होते. महाराजांनी या मोहिमेसाठी तीन हजारची फ़ौज तैनात केली होती. 
५०० मावळे आधीच धनुष्य तीर घेऊन झाड़ित दबा धरून बसले होते. थोड़े बहुत मावळे सेनापती नेताजी उतरत्या वाटेवर घेऊन छावणी टाकून वाट बघत होता आणि खुद्द महाराज पाठीमागून एखाद वादळ याव तसे येत होते. 
मराठ्यांनी अचानक हल्ला केला यात खानाचे सैन्य मेले पण पळापळीत जास्त दगावले. खान चांगलाच मधी सापडला, त्याला धड़ मागे ही जाता येईना आणि पुढे ही जाता येईना. शेवटी रायबागीन हिने सल्ला केला,"शिवाजी रुपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास तिथेच तू अर्धी लढाई हरलास, आत्ता दूत वकील पाठवून शरणागती पत्करावी, शिवाजी थोर आहे, शरण आलेल्यास अभय देतो." 
दूत पाठवून बोलणी झाली आणि तह झाला तो एकाच अटिवर झाला,"नेसत्या कपड्याशिवाय सर्व सोडून माघारी जाणे आणि माघारी न येणे." 
ही मराठ्यांची खुप मोठी सरशी होती. दिल्लीधिपती च्या मामाला अशी चपराक कोणीच मारली नव्हती. 

यावेळी महाराजांचे अश्वारूढ़ वर्णन अनुपुराणात खुप सुंदर केले आहे त्याची फोड़ अशी- 

' तो अती सुंदर व उंच मानेच्या, रुंद छातीच्या, शिकवलेल्या, सुलक्षिणी, धिप्पाड शरीराच्या व महाबलवान दोन्ही बाजूस बाणांचे दोन भाते पंखाप्रमाणे असलेल्या, रत्नजड़ित अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर-गरुडावर विष्णु बसतो तसा आरुढ़ होऊन अंगात कवच घातलेला व हातात धनुष्य बाण व तरवार असणाऱ्या घोड़दळाच्या समुदायांमध्ये होता, त्याच्या अंगात अभेद्य कवच होते, त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्राण शोभत होते, वैकक्ष हाराप्रमाणे व प्रचंड ढालीने शोभणारा दुपेटा परिधान केला होता. सोनेरी कमरपट्टयापासून लटकणाऱ्या तरवारीच्या योगे तो शोभत होता. त्याच्या हातात तेजस्वी भाला होता. तो अत्यंत सौम्य असूनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसत होता. तो शंकराहुनही उग्र, अग्निपेक्षा अत्यंत असह्य, वायुहुनही बलवान, कुबेराहुन ही धनाड्य, इंद्राहुन ही समर्थ, यमाहुन ही क्रूर आणि मदनापेक्षाही अजिंक्य होता." 

इथे गेल्यावर या स्मारकाकड़े पाहिल्यावर अंगात विज चमकुन जाते. उभा राहतो तो इतिहास 300-350वर्षापुर्विचा, उभा राहतो तो गरुडासारखा भिरभिरणारा सेनापती नेताजी पालकर आणि मराठ्यांची अजिंक्य सेना. 

मुजरा त्या प्रत्येक अनाम विराला ज्यान स्वराज्य राखण्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि जरीपटक्याला रंग चढवाला. 

हर हर महादेव.

Comments

  1. खुप छान वर्णन व् महत्वाची माहीती....जय शिवराय।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...