Skip to main content

अनामिक वाटेन केलेली नामिक भटकंती- नाथ बाबाच्या गुहा आणि हिरवा सह्याद्री.

सुट्टीवर आल्यापासून दोन आठवडे घरचीच काम चालली होती. कुठ फारस बाहेर जायला मिळाल नाही. गावाहुन येताना वरंधा घाटान आलो न दुपारी हुक्की आली म्हणून कर्नाळा एवढाच काय ते फिरण. तस ही आठवडा सुट्टी साठी इतर भटक्यांचे प्लान तर नेहमीचेच होते. पाऊस ही तसा उघड उघड पडायला सुरवात झाली होती. याच वेळी कस काय ते मला दुर्बुद्धी सुचली न स्टेट्स टाकला. स्टेट्स टाकताच भूषणचा फोन आला म्हणला नाथ बाबा च्या गुहा करायच्या का..? मी ऐकल होत पण गेलो नाही कधी. म्हटल,' ठीक...ठरल'. 
कोणाला न सांगताच गाडी हाकली सकाळी. 

नेहमी प्रमाणे विसावा नाश्ता करायच ठरल पण भूषण म्हटला खोपोलीलाच करु डायरेक्ट. मग सुसाट खोपोली. नाश्ता वगेरे करुन बाईक जाते तिथवर घालायची या अटीवर झेनित च्या दिशेन गेलो. दोघ ही अवली-भटके. दत्ताच देऊळ आहे तीथवर गाडी गेली. गाडी तीथ लावून आम्ही वाटेचा विचार करत होतो. कारण दोघांना ही वाटेची ख़ास कल्पना नव्हती. मग एक पुजारी वजा गावकरी भेटला त्याला विचारल तर म्हणे," आत्ता जाणार..? चार बोगदे पार करावे लागतात.." 
आमच उत्तर," तूम्ही रस्ता सांगा, चार बोगदे न चार डोंगर आम्ही बघतो ". वाट घेतली मग चालु झाला रोमांचकारी सफ़र. 



दत्ताच्या देवळाशेजारी डाव्याबाजूने वाट सरळ जाते ती डाव्याबाजूचे फाटे जातील तीच धरावी. मग मधी येणारे ओढ़े, घरंगळी वाट, ढोपरभर वाढलेल गवत, डोक्याच्या वर गेलेल्या करवंदीच्या जाळ्या सगळ तुड़वत ३०मी नंतर रॉक पैच लागतो. बरोबर ९० अंशाचे दोन टर्न आहेत. मध्ये मध्ये कोरीव पायर्या आहेत पण पावसाळ्यात पूर्ण शेवाळ असत. ग्रिप नसेल तर सरळ खाली. इथून पुढ गेल कि दोन वाटा आहेत एक उजव्या बाजुला जाते न एक डाव्या. उजवी वाट सरळ एका झाडीत जाऊन सुंदर अश्या धबधब्याजवळ जाते. आम्ही तीच निवडली. म्हणजे एक तास वाढीव. डावी वाट ज़रा वरती सरळच जाते. तीच खरी वाट आहे. आम्ही धबधब्याची मजा घेत आमचीच वाट काढत, क्लाइम्बिंग करत पठारावर आलो. मग समोर दिसतो रेल्वेचा पुल अन कोसळणारा सुरेख आणि वार्याच्या हिंदोळ्यावर खेळणारा धबधबा. डोंगराकडे तोंड केल कि मुंबईच्या बाजुला जायच आहे हे लक्षात ठेवायच. मग आम्ही वाट काढत, झाडी तुड़वत, दगडी चढत पुलावर पोहोचलो. हां एक पड़ाव. इथवर आमचा प्रवास झाला तीच खरी भटकंती. खुप अड़चणी आल्या, प्रसंगी नव्या रुजलेल्या गवाताने वाटा झाकल्या होत्या. शेवाळामुळे दगडी पैच निसरडते झाले होते. एवढीच काय ती तंगडतोड़. मग रेल्वे रुळावरुन मुंबईच्या दिशेन चालत जायच. चार बोगदे पार करायचे. पण बोगदे पार करताना येणार्या रेल्वे ची खबरदारी घेण खुपच गरजेच आहे. खुप पाऊस असेल तर निट आवाज सुद्धा येत नाही आणि अचानक रेलवे रुळावर तुम्ही जोरात पळू सुद्धा शकत नाही. म्हणून चार बोगदे पार करताना विशेष काळजी म्हणजे आवाजाचा अंदाज बांधने. रुळावरील कंपन आणि खुप लांबून येणारा हॉर्न चा आवाज यावरुन वेगाचा अंदाज बांधता आला पाहिजे आणि मग बाजुला जवळच असलेल्या वाढीव जागेत सुरक्षित जाऊन थांबणे. 

चार बोगदे पार केल्यावर चौथा बोगदा संपेल तिथेच डाव्याबाजुला बोर्ड लावला आहे. त्याच दिशा दर्शकाने वरती चाल करावी. आम्ही चालत चालत वर गेलो ते एका छोटेखानी पठारावर. तिथून पुन्हा छोट्या खिंडित उतरायच. खंडित प्राजक्तिचा सडा पडला होता आणि सुगंध तर बेभानच होता. 


खिंडीतुन वर जाताना पायर्या आहेत. वरती दगडात कोरीव गुहा आहे. शिवलिंग आहे. डाव्याबाजुला दगडात कोरलेली जुनी पण आत्ता शेंदुर फासलेली गणपती मूर्ती, वीणा हाती घेतलेली एक पूर्ण कोरीव प्रतिमा आणि तूटलेले दगड आहेत. शिवलिंग थोड आत आहे त्याबाजुला पाण्याच टाक आहे.







आत्ता गुहा ही पूर्ण रेलिंग लावून बंदिस्त केली आहे. तिथे पुजारी असेल तरच उघडी असते. इतिहास फार नाही माहीत तिथे कोणाला पण पांडवकालीन आहे अस म्हणतात तसा काय पुरावा नाही सापडला. तिथे कोणी नाथ बाबा नावाचे रहायचे म्हणून नाथबाबा ची गुहा. येतानाचा प्रवास खुपच रोमांचक झाला कारण पाउस आणि पुन्हा घसरडी वाट. मग काय पुल स्लाइड करत आलो खाली. 


भटकंती उगाच भटकायच म्हणून नसते तर खुप काही शिकवून जाते. एरव्ही मळलेल्या वाटा पावसात तुम्हाला सगळ रान-डोंगर कसा फ़िरवतात याचा ख़ास अनुभव आला. एक भटका दुसर्या भटक्याच्या कामी कसा येतो. भटक्यांची एकच जात असते ती म्हणजे ' भटकी ' आणि त्यांचा देश ही एकच असतो तो म्हणजे हां अफाट ' सह्याद्री '. डोंबीवलीच्या 'पाऊल ट्रेकर्स' च्या ओळखी झाल्या. त्याचे खुप खुप धन्यवाद. त्यांनी फळ न बिस्किट-चिवडा असा फराळ आम्हाला दिला. पुन्हा भेटू असा आम्ही सुद्धा वादा केला आणि परतीचा प्रवास सुकर केला. 

माझी भटकंती ही अशीच असते ना कधी नियोजन ना कधी पूर्व तय्यारी. फ़क्त मनात आल की निघालो. एक पारले जी आणि एक पाण्याची बाटली बस्स एवढाच संसार बाकी कोण येवो अगर न येवो. 

दुर्गमित्र पनवेल चा हुन्नरी भटका भूषण असबे चे आभार मानणार नाही पण नव्या जागे साठी थ्रिल आणल्या बद्दल थैंक्स मित्रा. 
पुन्हा एकदा सुहास, रुपेश, बापू आणि विठ्ठल तुम्हाला मिस्स केल. अचानक ठरल म्हणून माफ़ करा. 
-दर्यासारंग


Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...