Skip to main content

सफर भन्नाट AMK ची : भाग -3

सफर भन्नाट AMK ची : भाग -२

सफर भन्नाट AMK ची : भाग -1


गुहेत सगळीकडे अंधार पसरला होता आणि आमच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले होते. आजच्या जेवणाची जबाबदारी मी स्वतःवर घेतली होती. मग खिचडी भात बनवून त्यावर ताव मारला. या trek मध्ये खाण्याच्या बाबतीत मागील काही trek पेक्षा जास्त royalness दिसुन आला तो म्हणजे राजू सरांनी आणलेल्या बदाम, काजू, खजूर, रेवड्या, पेढे अशा अनेक पदार्थांमुळे. आता मात्र मनसोक्त गप्पा आणि विनोदाचं session रंगणार होतं. मनसोक्त गप्पा मारून, सगळं काही आवरून मग आम्ही आपापल्या अंथरूणात उडी घेतली. थंडी बरीच होती. त्यामुळे रात्री झोपलेल्या जागीच सकाळी जाग येणे तसे अवघडच. कुलंगच्या त्या गुहेत अगदी शांत झोपेत असतानाच पहाटे एक आवाज येतो " उठा रे सुर्योदय होणार आहे " आणि सर्व लगबगीने उठून आपापला camera घेऊन बाहेर पडतात. Trek वर असतानाचा हा दुसरा सुर्योदय आमच्या वाटेला आला. या सुर्योदयाचं महत्व फार जास्त या कारणाने की तिथुन मागील २ दिवसात पादाक्रांत केलेले दोन्ही गड एका दृष्टिक्षेपात दिसुन येत होते. संपूर्ण गड फिरून मनसोक्त photography करून आम्ही पुन्हा गुहेत पोहोचलो. वसीम भाय ने नाश्त्याला maggie बनवली होती. ती खाऊन आम्ही खाली उतरण्यास सुरवात केली. 


सांधन दरी

अमृतेश्वर मंदिर
 कुलंग, छोटा कुलंग असं बरचसं अंतर शक्य तितक्या लवकर कापून पुढे मग सांधन दरी व अमृतेश्वर मंदिरसुद्धा करण्याचा निर्धार आम्ही केला होता. जाताना AMK जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेतला आणि परतीचा मार्ग धरला. मी Gear टाकला आणि जमेल तेवढ्या speed ने खाली उतरण्यास सुरवात केली. रस्ता पूर्णतः कारवी, शेंद्री अशा अनेक वनस्पतींनी वेढलेला होता. धावता पळता मग आम्ही शेवटच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचलो. वसीम भाय ची req आली की काही वेळ इथे आराम करून मग पुढे जाऊया. तसे मग सगळे थोडा वेळ विसावले. त्या विश्रांतीने Power nap सारखम काम केलं व त्यानंतर भरभर चालून काही वेळातच घाटघर गाठलं. घाटघरला परतल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तेज आले होते. आजिबात वेळ न दवडता आम्ही सांधन दरीकडे निघालो. अर्ध्या तासात आम्ही साम्रद गावी पोहोचलो. तिथुन मग १ km अंतरावर सांधन दरी चालू होते. सांधन दरी चालू होताच तिच्या तोंडाशी दारूच्या अनेक बाटल्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. त्याबद्दल लिहून पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या किती सर्रासपणे चालल्या आहेत हे मला लक्षात आणून द्यायचं आहे. पुढे गेल्यावर निसर्गाचा अदभुत नमुना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने २००-३०० फुटांपेक्षा जास्त उंच कातळकडे आणि मध्ये जेमतेम १० फुटांची घळ अशी ती निसर्गाची रचना होती. जवळ-जवळ ४-५ km लांब असणारी ही दरी पाहून सह्याद्रीचे एक वेगळेच रूप मला पाहायला मिळाले. तेथे अखंड वाहणारे पाण्याचे झरे व काही ठिकाणी कमी अधिक उंचीमुळे पाण्याचा होणारा आवाज निसर्गप्रेमींसाठी मन सुखावणारा आहे. सांधन जमेल तेवढी बघून मग मात्र आम्ही अमृतेश्वराकडे धाव घेतली. 
सांधन दरीत जात असताना डाव्या बाजूला रतनगड आपल्यासमोर उभा असतो. त्याच्या पायथ्याशीच अमृतेश्वराचे अंदाजे १२व्या शतकातील हेमाडपंथी बांधणीचे असे हे देखणे मंदिर बघताक्षणीच आपल्या डोळ्यांना भुरळ घालते. मंदिराचे आवार बऱ्यापैकी स्वच्छ ठेवण्यात आले असून आजुबाजुला मात्र विद्युत पुरवठा करणारे काही खांब अस्ताव्यस्त असे पसरले आहेत.(frame खराब करण्यास कारणीभूत) मंदीर तसे फार मोठे नसून मध्यम आकाराचे आहे. गाभाऱ्यातील नक्षीकामाचे बारकाईने निरिक्षण केल्यास काही पुरातन अध्याय आपल्या समोर येतील. मंदिराची रचना अतिशय कलात्मकरित्या करण्यात आली आहे. जवळच पुष्करणी तलाव तितक्याच सुबकतेने घडवण्यात आला आहे. त्यावरील कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे. या सर्व गोष्टींचे हवे तितके photo काढून मग अमृतेश्वराचा आम्ही निरोप घेतला. 
AMK मध्येही मला सह्याद्रीच्या अनोख्या रूपाचे दर्शन झाले. तसेच बऱ्याचश्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपणच सह्याद्रीची योग्य ती निगा राखली तर येणाऱ्या काळातही इतरांना त्याचे हे रूप अनुभवता येईल. सह्याद्रीने आपल्याला भरभरून दिलेले आहेच पण आता मात्र त्याचं काहीतरी देणं आपण लागतो ही भावना लक्षात घेण्यासारखी आहे. आपापल्या परीने आपण जमेल तेवढं सह्याद्रीली जपायचं कोण जाणे तुम्हाली बघून इतरही inspire होतील आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. चला उठा तर bag pack करा आणि सज्ज व्हा सह्याद्रीत फिरायला....


AMK & Kalsubai Range

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...