Skip to main content

सफर भन्नाट AMK ची : भाग -२

सफर भन्नाट AMK ची : भाग -1


सकाळचे ५.३० वाजले तसा सरांनी मला आवाज दिला, घरी एका हाकेत कधीही न ऊठणारा मी खाडकन जागा झालो. क्षणाचाही विलंब न लावता camera घेऊन सगळे वीर निघाले सुर्याचा मागोवा घेत. ६.३० वाजून गेले बऱ्यापैकी तांबडं फुटलं होतं. डाव्या हाताला नवरा-नवरी सुळक्यांसह दुरवर कळसुबाई ठामपणे मी महाराष्ट्रात सर्वोच्च आहे अशी बतावणी करत होता. तर उजव्या बाजूला भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्राच्या अगदी बाजूलाच उभा असलेला रतनगड काहीतरी खुणावत होता. तेवढ्यात सुर्यदेव अवतरले आणि त्यांना आपापल्या camera मध्ये टिपण्याची जणू स्पर्धाच आमच्यात सूरू झाली.


सुर्यदेव अवतरले

भंडारदऱ्याच्या पाण्यात सुर्यकिरणे पडल्यावर त्याचे ते सौंदर्य मोहून टाकणारे होते. सोनेरी जलाशय व आजुबाजुचा परिसर सुर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. पाय काढता काढवत नव्हता पण आज बरच चालायचं होतं त्याकारणाने अलंग संपूर्णपणे न्याहाळून गुहेच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ थांबून मग आम्ही मदनच्या दिशेने कूच केली. 
अलंगला मागे टाकत आम्ही निघालो बहुचर्चित मदन किल्ल्याकडे, वाटेत पहिल्यांदा आडवा आला तो अलंगचा ५० फुटांचा rock patch. जागा तशी फारच अरूंद व निसरडी आहे, खाली बघितल्यावर उंचीची भिती वाटण्याऱ्यांना तर गरगरल्याशिवाय राहणार नाही अशी. इथून आम्हाला rappelling करून खाली उतरायचे होते. सोसाट्याचा वारा व दूरून दिसणारे आंबेवाडी गाव आमच्या साथीला होते. Rope anchor केला गेला आणि आम्ही ठरवलं आज गळपळाट सर उर्फ वसीम भाय यांना आधी खाली उतरू द्यायचे. ठरल्याप्रमाणे वसीम भाय ला harness घालण्यात आला. खाली उतरण्याआधीचे त्याच्या तोंडावरील expressions लाखमोल होते. सुरवातीला अगदी घाबरत पण नंतर मग व्यवस्थितरित्या वसिम भाय खाली उतरला. माझ्या हातात camera सोपवून राजू सर व सलीम भाय व्यवस्थियपणे खाली उतरले. सरते शेवटी मीदेखील खाली आलो आणि मग पुढची वाटचाल सुरू झाली. आता मदनच्या ओढीने सर्व पटापट पाय उचलू लागले होते. अलंग अर्धा व मदन पूर्ण असा traverse पूर्ण करून मदनच्या दगडात कोरलेल्या पायऱ्यांपाशी आम्ही पोहोचलो. दगडात कोरलेल्या या पायऱ्या अतिशय सुंदर व सुबक आहेत. काही अंतर चालल्यावर मदनचा सुप्रसिद्घ ३५-४० फुटांचा rock patch समोर येऊन ठाकला. वर पाहिल्यावर सुरूंग लावून पायऱ्या फोडण्याची निशाण असलेल्या patch चे दर्शन होते आणि मग आपोआपच इंग्रजांच्या कुळाचा उद्धार आपल्या तोंडातून केला जातो. इंग्रजांना मनसोक्त शिव्या घालुन मग आपण rock patch climb करायला सुरवात करतो. सर्वात पहिले मी climb करून वर गेलो आणि मग हळू-हळू हे तिघेही वर आले. Rope तसाच ठेऊन मग आम्ही पुढे निघालो. राजू सर तर मदनच्या पायऱ्यांच्या अगदी प्रेमातच पडले. काही वेळानंतर एक दरवाज्याप्रमाणे भासणारे भग्नावस्थेतील जागा आम्ही पार केली आणि मदनच्या desk वर जाऊन पोहोचलो. खालूनच दिसणाऱ्या नेढ्याबाबत मी आधीच उत्सुक होतो म्हणून मग त्याच्या शक्य तितक्या जवळ जाऊन मी त्याला माझ्या camera मध्ये कैद केले. मदनच्या सर्वोच्च टोकावरून अलंग आणि कुलंग दोन्ही किल्ल्यांची भव्यता लक्षात येते. मदनवर असणारे पाण्याचे टाके व त्यातील थंडगार, सुमधुर पाण्याची चव मी कधीही विसरू शकणार नाही. मदनचा परिसर न्याहाळून मग पुढे पुन्हा त्या rock patch पाशी आलो. यावेळी तो rappel करून जायचं होतं. अगदी सहजपणे सर्वांनी तो टप्पा पार केला. 


Rappelling

आता आम्हाला वेध लागले होते ते कुलंगचे, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला संध्याकाळी कुलंगवर पोहोचायचे होते. Traverse फार मोठा असल्याने वेळ दवडून चालणार नव्हते. मदन खाली उतरून पुन्हा मदन आणि अलंगच्या मध्ये असणाऱ्या घळईच्या उजव्या बाजूच्या मार्गाने चालण्यास सुरवात केली. थोड्या अंतरावर सायाळच्या गुफेप्रमाणे एक गुफा लागली. तिथेच मग पोटापाण्याचा बंदोबस्त केला. आता मात्र वाट तीव्र उतार असणारी व घसरडी होती. तुरळक कारवीच्या सान्निध्यातील तो रस्ता तसा थोडा कठीणच !! कुलंगचा मुख्य पर्वत येण्याआधी एक अत्यंत निसरडा patch आहे. त्या patch ची एक कटू आठवण आहे. एवढंच म्हणेन की या patch वर योग्य ती काळजी घ्यावी. आता फक्त कुलंगचा traverse सर करायचा होता. त्यानंतर काही वेळातच आम्ही कुलंगवर पोहोचणार होतो. कारवीच्या साम्राज्यातून जाणारी वाट थेट कुलंगवाडीतून येणाऱ्या कुलंगच्या मुख्य रस्त्यावर आणून सोडतो. तिथुन पुढे मग अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर आम्ही कुलंगच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. अखेर सुर्यास्ताच्या अगदी काहीवेळापूर्वी आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. कुलंग सर केल्यावर मात्र जो आनंद मिळाला तो अवर्णनीय होता. अगदी एखादी स्पर्धा जिंकल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद वसीम भाय च्या चेहऱ्यावर दिसुन येत होता. पाण्याचे टाके अगदी बाजूलाच असल्याने २दिवसांनंतर अगदी royal अंघोळीचा योग आला. वातावरणातील गारवा आणि freezing cold पाणी अंगावर अगदी जोरात आरोळी बाहेर पडली. 

क्रमशः 






Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...