Skip to main content

सफर भन्नाट AMK ची भाग -१

जवळ-जवळ महिनाभरापूर्वी AMK करायचा असे मनात आले आणि राजू सरांना चौकशी करायला सांगितले. सरांनी सर्व चौकशी करून मग तारिख final करायला मला call केला आणि 31,1,2 feb तारिख पक्की झाली. सुरवातीला मी, राजू सर, दत्तू दादा आणि सलीम भाय(सुरेश भालेराव), किरण बानखेले एवढेच member जायचं fix झालं होत पण मग कुठुनतरी वसिम भाय(विशाल नाईकवाडी) ला आमचा plan कळाला आणि मग बोम्बल्या दादासंग तो trek मध्ये add झाला. आता ओढ लागली होती ती प्रत्यक्ष ट्रेकचा दिवस कधी उजाडेल त्याची. Pre-planning whatsapp वर सुरु झाली होती. जसा-जसा trek चा दिवस जवळ येत होता तसे-तसे काही member विविध कारणास्तव cancel होत गेले. राजू सर आणि मी मात्र ठाम राहिलो म्हंटलं अगदी कोणी आलं नाही तरी चालेल आपण दोघं जायचच. ३० तारिख उजाडली आणि मग एकच धावपळ सूरू झाली. मी संध्याकाळीच राजू सरांकडे ओतुरला पोहोचलो, तिथे वसिम भाय आधीच हजर होता. जेवण वगैरे करून गप्पा गोष्टी करत मग आम्ही पडी घेतली. सकाळी लवकर आवरून आम्ही राजूरला पोहोचलो तिथून मग सलीम भाय ला उचलला आणि तथाकथित AMK च्या दिशेने कूच केली. भंडारदरा धरण, रतनगड परिसर, कळसुबाईची मागची बाजू तुडवत आम्ही अखेर घाटघर या base village मध्ये आलो. वाटाड्या भाऊ गायब असल्याने आता हातात बराच वेळ होता. तसं मग घाटघरच्या आसपासचा कोकणकडा, उंबरदरा, घाटघर विद्युत प्रकल्प असा बराचसा प्रदेश आम्ही पिंजून काढला. गावातील शाळेजवळ मग photography चालू केली, तेवढ्यात आमचा वाटाड्या येऊन थबकला. भर उन्हात दुपारच्या २.३० वाजता आम्ही ५ जणांनी मूळ trek ला सुरवात केली. 

AMK - Another View from d backwater of bhandardara dam
दुरून दिसणारे AMKचे कातळकोरीव कडे लक्ष वेधून घेत होते. जवळपास तासाभरानंतर आम्ही अलंगचा मुख्य पर्वत चढण्यास सुरवात केली. भला मोठा अलंग अगदी ऐटीत उभा राहून आम्हाला जणू हिणवत होता. सुर्य चांगलाच तापला होता व त्यामुळे होण्याऱ्या दमछाकतेमुळे पाण्याच्या बाटल्याही लगोलग बाहेर येत होत्या. वाटेत अनेक करवंदीची, आंब्याची तसेच विविध औषधींची झाडे आपलं अस्तित्व त्यांच्या गंधाने जाणवून देत होती. किर्र्र शांतता, आमच्या मस्तीचे बोल, वसिम भायचे "जरा वेळ बसा रे" असे शब्द वेळोवेळी कानी पडत होते. खडी चढाई चांगलीच दमछाक करित होती. मध्येच काही भाग चढून गेल्याने अगदी स्पष्ट दिसणारे मदनचं नेढं नेत्र सुखाऊन गेलं. आपापल्या camera मध्ये सर्वजण हे क्षण अगदी न चुकता टिपत होते. आता मात्र जवळचा पाण्याचा साठा पार संपून गेला होता. अलंगच्या कातळकड्याच्या चढाईचा टप्पा सुरू झाला होता. काही अंतर चालताच पाण्याचा एक छोटेखानी झरा लागला आणि मग सर्वांच्या घशात थोडंफार पाणी गेलं. त्या पाण्याने स्फूर्ती घेऊन पटपट चालून अखेर सर्वजण अलंगच्या पहिल्या rock patch पाशी पोहोचले. Patch जवळच एक लोखंडाची शिडी बघून माझ्या मनाला फार दुःख झाले. शिडी बसवली की मग AMK वरसुद्धा इतर गडांप्रमाणे पार्ट्या रंगणार, पर्यटनाच्या नावाखाली गडाची विल्हेवाट लागणार या व्यथेने मी दुःखा झालो, असो. समोर आव्हान होतं ते१२ फुट खड्या rock patch चं. वाटाड्याने free climb करून आमच्या सर्वांच्या bags वर खेचून घेतल्या. मी ठरवलं की ही patch मीसुद्धा free climb करूनच पार करणार आणि ते करण्यात मी यशस्वी झालो. माझ्या मागून मग वसीम भाय वर येण्यास सज्ज झाला. Rope लावलेला असतानादेखील बंड्याचे पाय थरथरले (cramp आल्याने असं त्याचं म्हणणं) आणि इतूनच मग त्याच्या 'गळपटण्याचा' श्रीगणेशा झाला. कसाबसा त्याला वर घेतला. नंतर राजू सर व सलीम भाय वेळ न दवडता वर आले. पुन्हा मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरवात केली. 


अलंग
आता सूर्य अस्ताला गेला होता. त्याच वेळी आम्ही अलंगच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचलो. महादरवाजात मोठमोठ्या आकाराच्या शिला पडलेल्या असल्या कारणाने ते पुर्णपणे बंद झालेले आहे. त्याच्या उजव्या बाजूने मग आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. सुर्यास्तामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याच अंधारात मग आम्ही अलंगचा भयानक traverse पार केला. रस्ता तसा सरळच होता पण खाली-वर असणारे भले मोठ्ठे दगड, त्यातून जाणारी जेमतेम एक माणूस जाईल एवढी पायवाट, एका बाजूस असणारी अत्यंत खोल दरी आणि किर्र्र अंधाराने ह्या रस्त्याला एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून दिले. अर्ध्या-पाऊण तासाच्या वाटचालीनंतर आम्ही अखेर अलंगच्या गुहेजवळ पोहोचलो. अलंग सर केल्याने सर्वजण खूष होते आणि जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाक्याने सर्वांची पाण्याबद्दलची चिंता दूर झाली होती. आता मात्र भूकेने सर्वजण व्याकूळ झाले होते. पाण्याची सोय करून मग वाटाड्या दादाने खिचडी बनवली. गुहेत आधीपासूनच काही जण हजर होते. आम्ही जेवण वगैरे करून मग झोपण्याची जागा निश्चित केली. सर्व सामान आवरून दिवसभरात घडलेल्या घटनांचा मागोवा घेत मग आम्ही सर्वांनी पडी घेतली कारण सकाळचा सुर्योदय कोणालाच चुकवायचा नव्हता. 

क्रमशः
अलंग

अलंग
अलंगवरील पाण्याची टाकं.

अलंग
अलंग top आणि धुक्यात हरवलेला घाटघरचा कोकणकडा ...
AMK - d whole range

Comments

  1. AMK चा ट्रेक हा सह्याद्रीच्या सर्वात कठीण ट्रेक पैकी एक मानला जातो... त्यातील पहिला टप्प्याचे सुंदर वर्णन वाचून खूपच आनंद वाटला... लवकरच पुढील टप्प्यांच्या वर्णनाची आतुरतेने वात बघतोय...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...