Skip to main content

आयुष्य खुप सुंदर आहे आणि थोड़ी सुरक्षा घेतली की आणखी सुंदर बनते.

प्रिय मित्रांनो,

सांगायचे असे की पावसाळा बर्यापैकी चालु झाला आहे. चार महीने राकट रूप दाखवलेल्या वसुंधरेन आत्ता नाजुक नव्या नवरीच रूप धारण केल आहे. अनेक नवे-जुने ओहोळ स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. डोंगररांगा आणि त्यावरच्या शिखरांनी तर हिरवा रंग परिधान करून स्रुष्टिच्या नव्या रुपाच्या स्वागताची तयारी केली आहे. डोंगरावरून वाहणारे असंख्य धबधबे जणू दुधाची बरसात करत आहेत आणि काही उंच डोंगर आणि शिखरे जी काही मागील महीने उन्हाच्या तापात जळत होते ते आत्ता तर ढगांच्या गालिच्यावर निवांत निद्रावास्थेत आहेत. ही सगळी स्वर्ग साधने पाहून कोणीही भारुनच जाईल म्हणजे सामान्य माणूसच नाही तर देव सुद्धा नाचतिल. अर्थातच हे आहेच इतक सुंदर आणि मन-लोभस. तुम्हाला ते सृष्टि सौंदर्य साद घालतय तुम्ही जा आणि त्याचा अखंड आनंद घ्या. पण हे सगळ वर्णन तर तुम्ही तुमच्या घराशेजारी किंवा प्रवासात अनुभवता आहात मग माझ्या सांगण्याचा काय फ़ायदा. माझ्या सांगण्याचा एकच उद्देश मित्रांनो की मजा करा पण काळजी ही घ्या स्वतःची आणि आपल्याबरोबर आलेल्या हौशी मित्रांची. पावसाळी सप्ताह सुट्टी घेउन निघालेल्या आणि धुंदीत दुर्लक्ष करून मस्तीत आणि तरुणाई च्या जोशात आलेले अनेक ग्रुप्स आज ही मजा स्वर्गातुन पाहत असतील. 

माझ्या निसर्ग प्रेमी मित्र, पर्यटक आणि नवे नवे ताज्या दमाचे हौशी ट्रेकर्स यांना विनंती वजा संदेश.  फिरा, भटका मजा करा पण भानावर असुद्यात डोकी. नयनरम्य घाटात गाडी लावून धावणार्या धगांचे सुंदर क्लिक करून मित्रांसोबत शेअर करा. थोड थांबुन गरम गरम भजी-चहा किंवा मक्याच्या कणसाचा आस्वाद घ्या. थोड भिजा. पण चुकुन सुद्धा उत्साहा पोटी अथवा उत्सुकते पायी रस्ता सोडून घाटातुन उगाच खाली रानात किंवा दरीत उतरण्याचा प्रयत्न करू नका. पावसाळी पाण्याने माती ठिसूळ झाली असेल तर जिवावर बेतु शकत. 


नव्या नव्या आणि ताज्या दमाच्या छोट्या- छोट्या ट्रेकर्स मित्रांनी शक्यतो पावसाळी ट्रेक टाळावेत उगाच अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग नकोत. तुम्हाला खुप काही फिरायच आहे आणि तुमच्या पायांनाही खुप चालायच आहे. शक्यतो आपल्या पेक्षा अनुभवी लोकांचा किंवा संस्थांचा सल्ला जरुर घ्या यात कमीपणा नाही उलट तुमचा शहाणपणा आहे. आणि सर्वात शेवटी उगाच कामातून वेळ नाही मिळत आणि मोकळ व्ह्यायला नाही मिळत म्हणून शनिवार रविवार सुट्टी किंवा मान्सून सुट्टी घेउन घाटात अथवा डोंगर पायथ्याला फक्कड पार्ट्या उड़वणारे यांना ख़ास विनंती वजा सूचना. उगाच दारु-सोड्याचे बेत करून, कोंबडी-वडे हाणून , तोंडातून सिगारेट चे धुर काढत घाटा-रस्त्यातुन फिरू नका. नशेच्या धुंदीत होणार्या दुर्घटनेत आपला ही नंबर स्वतःहुन लावून घेउ नका. तुम्हाला फिकिर नसली तरी घरी तुमची फिकिर करणारे आहेत. कोणाची आई वाट बघत असेल कोणाची पत्नी तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणाचा बेत करत असेल तर कोणाची मुलगी शाळेतील तीच झालेल कौतुक तुम्हाला सांगायला दरवाज्यावर उभी असेल. म्हणून तुमच्या बेफिकिरीसाठी नाही तर त्यांच्या फिकिरी साठी तरी शुद्धित रहा आणि निसर्गाशी खेळण्यापेक्षा त्याचा मनमुराद आनंद घ्या.


घरातून आणलेल्या खाद्यपदार्थ, प्लास्टिक बैग्स, केचप्स बोत्तल्स उगाच कोणी नाही किंवा सार आमच्या बापानेच सोडून ठेवलय म्हणून इतस्थता टाकू नक़ा. जाताना गार्बेज बैग घेउन जा. त्यात सर्व जमा करून तो शहर वस्तीत किंवा जवळच्या गावात कचराकुंडित टाका. अगदी प्राणी मात्रांवर प्रेम ओतु जाणार्यांसाठी ख़ास विनंती घाटात फिरनार्या माकडांना, मुक्त फिरनार्या पक्षाना घरचे खाद्य खायला घालू नक़ा. ते त्यांच खाद्य शोधून खायला समर्थ आहेत. ते त्यांच बघतील तुम्ही तुमच बघा. तुमच घरच खाद्य हे त्यांच खाद्य नाही त्यांना त्याची सवय नसते. कधी कधी त्यांच्या जिवावर सुद्धा बेतत. म्हणून खायला घालू नका. आणि उगाच माकड दिसल म्हणून त्याच्याजवळ जाउन दोन माकडांचा एकसाथ फोटो काढ़ने हे फालतू बालिश धंदे करू नका. ते जनावर आहे उगाच त्याच्या मनात कधी काही येईल सांगता येत नाही उगाच स्वतःच्या थोबाडाची आणि जिवाची वाट लावून घ्याल. 


असो सांगायचा उद्देश एकच आम्ही सुद्धा फिरतो या दरया-खोर्यात खुप नैसर्गिक आनंद उपभोगातो पण एक जाणते आणि निसर्ग प्रेमी म्हणून याची खात्री करूनच. कधीही कुणाला त्रास करू नका कदाचित तेच उद्या तुमच्या नशिबाची होळी करतील. मग पश्चातापाने डोक आपटण्यापेक्षा आत्ताच ठरवून चला आणि आनंद घ्या. 


फिरा नव्या सृष्टीचा आनंद घ्या काही देखावे अथवा मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत घालवलेले क्षण कैमरामध्ये कैद करून घरी येउन बघा आणि आठवा त्या safety and sweet weekend trip ची मजा मग बघा गालावर उमटणारी नाजुक खळी किती समाधान देऊन जाते. 


"आयुष्य खुप सुंदर आहे आणि थोड़ी सुरक्षा घेतली की आणखी सुंदर बनते."

Please be safe in monsoon. If you see somewhere dangerous things you immediately inform another people's or write on your social networking sites. Is precautionary message for others. So be alert and We wish Yours journey will be Safe and sweet.

Wish you happy monsoon from जातिवंत भटके. 






Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...