Skip to main content

प्रवास चंदेरीचा भाग-१


खूप दिवसापासून घर आणि ऑफिस करून करून डोक्याच भज झाल होत. रोजचा ट्रेनच्या गर्दीमधला या नोकरदाराचा कंटाळवाणा प्रवास, लोकांना धक्का देत, रस्त्यातल्या वाहनांना हुलकावणी देत, ऑफिसपर्यंत पायाची चाललेली रपेट, अक्षरश: कंटाळलो होतो. रोजच तेच ते जिन. मुंबईच्या भाषेत बोलायला गेल तर " खानेका पिनेका बत्ती बुजानेका" पण अश्या मुंबईकरांची विचारसरणी मला पटत नाही. मला प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहायला आवडत. बोंबलत भटकायला आवडत आणि बोंबलत भटकायचं तर या सह्याद्रीत.
त्यात तोरणा- राजगड नंतर एकही ट्रेक झालाच नव्हता. त्यात मित्रांचे फोन यायचे. कधी जायचं रे ट्रेकला.. इवेन्ट ठरवा कि लवकर.. जानेवारी संपते तोच शिवजयंती जवळ आली होती म्हणून ट्रेक रद्द करायचे ठरले होते. तोच १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस आलाच. गडवाटची यंदाची शिवजयंती थाटामाटात सिंधुताई यांच्या आश्रमात झाली. भरून पावलो होतो. सगळे गडवाटचे मित्र एकत्र आले होते. आता माझी खैर नव्हती. पुन्हा मित्रांनी बोलायला सुरुवात कधी जायचं रे ट्रेकला..? यावेळेस कोणत्या गडावर..??
त्यावेळेस तोंडातून शब्द पडला "चंदेरी".. त्यात दोघा तिघांनी विचारले हा कोणता गड रे..?? नवीनच ऐकतोय..
नेमका गडच आहे ना ??
माझे उत्तर ठरलेले होते.. हो चंदेरीच.. मुंबईजवळच आहे तो.. नेटवर सर्च कर..
त्यानुसार हा ट्रेक फ़िक्सं झाला.. उन्हाळा जास्तच वाढल्यामुळे हा ट्रेक रात्रीचा करायचा ठरलं..
वार ठरला आणि वेळही ठरली. २ मार्च रात्री ९.३० ते ३ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत.
झाल... २३ फेबला तशी इवेन्टची पोस्ट पडली आणि नाव नोंदणी करणे अनिर्वाय केले होते..तशी फोनची रिंग वाजू लागली..
१ मार्चपर्यंत माझ्याकडे फक्त ३९ जनाची अधिकृत नोंदणी झाली होती.. त्यानुसार आमचे नियोजन ठरले...
खूप जणांना हा चंदेरी ट्रेक कसा आहे याची माहितीहि नव्हती. त्यात आमची वाट जर वेगळीच होती. बहुतांशी ट्रेकर्स मंडळी बदलापूरहून चिंचोली गावातून हा ट्रेक करतात.. नि आम्ही त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजेच पनवेलहून जवळ असलेल्या तामसई गावातून हा ट्रेक करणार होतो.. हा ट्रेक जरा हटके होता थकवा देणारा.. थरारक.. अविस्मरणीय..

{ या चंदेरीगडाविषयी थोडक्यात ( सदर माहिती मंगेश खरात याची कॉपी केली आहे) :- चंदेरी किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील एक दुर्गम आहे.

नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभमंडळाचे मानकरी असणार्‍या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीच्तील एक बेजोड आव्हान आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे. }

आलेल्या नाव नोंदणीनुसार १ मार्च रोजी आम्ही गाडीची आणि जेवणाची व्यवस्था केली.. तरीही २ मार्च रोजी सुद्धा काहींचे फोन येवू लागले. मला नाही म्हणता येत नव्हते. तशी रात्री ५ वाजेपर्यंत मुलांची संख्या ४६ झाली होती. सर्वाना पनवेलच्या एस टी डेपोजवळ यायला सांगितले होते.
मी थोडा लवकरच पनवेल डेपोत येवून पोहोचलो होतो. ९ वाजताच तसे हळू हळू एकेकजण यायला सुरुवात झाली.
फोन आला कि त्यांना मी कुठे उभा राहिलो आहे याचे ठिकाण सांगायचो.. (नवनाथ रसवंती गृहासमोर किंवा [मुतारी] समोर असलेल्या झाडाखाली.) :D

काही वेळातच १०-१५ जन वेळेत आले होते.. आता वाट पाहत होतो सर्वांच्या येण्याची..

क्रमश:

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...